ताज्या घडामोडी

युवक महोत्सवातील कव्वाली कला प्रकारास प्रेक्षकांची दाद

नांदेड/ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवा स्पर्धक कलावंतांनी एका पेक्षा एक सरस कव्वाली सादर केल्या..कव्वाली ऐकण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.या कला प्रकाराला चांगलीच दाद मिळाली.
वसमत येथील बहिर्जी महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी
..मेरी जान जाए वतन के लिये..ही देश भक्ती पर कव्वाली सादर करत प्रेक्षकांची टाळ्यांची दाद मिळवली.ही कव्वाली भुजंग मुळगिर,संबोध भुसावळे,श्रद्धा मोरे,संस्कृती शिंदे, शिवरानी शिंदे आदीं स्पर्धकांनी सादर केली.
‘आज गहरी निंद ने ‘ ही कव्वाली शिवाजी कॉलेज परभणीच्या अभिरुपा पैजने,राज भालेराव,वैष्णवी गिरी,कृष्णा लिंबेक र आदी कलावंतांनी हुबेहूब गायली.
एम जी एम महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र च्या स्पर्धक कलावंतांनी ‘ ‘मेरी जान जाए ..वतन के लिये..!
ही देश भक्ती पर कव्वाली सादर केली.या कव्वाली त प्रणव चंदेल,विवेक मुसले,ऋतुजा घाटोल, रुद्रानी पत्रे,प्रार्थना हलदेकर आदी स्पर्धकांनी सादर केली.
‘ झूम बराबर झूम शराबी’ ही कव्वाली ला प्रेक्षकांची पसंदी मिळाली.
यावेळी युवक महोत्सवाचे आयोजक प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर, प्राचार्य डॉ. सुनील हंबर्डे, डॉ. सोमनाथ पचलिंग, प्रा. प्रवीण मुळीक, डॉ. मामा जाधव, डॉ. कमलाकर चव्हाण, डॉ. ज्ञानदेव राऊत, डॉ.विजय भोपाळे, डॉ.रामचंद्र भिसे डॉ. बालाजी भंडारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी केले.
——————————————————————————————

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.