ताज्या घडामोडी

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला युवक महोत्सवाच्या जलशातून महामानवांच्या कार्याचा उजाळा

नांदेड: प्रतिनिधी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानतीर्थ-२०२४’आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या मुख्यमंचावर रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी एकापेक्षा एक सरस असे जलशे स्पर्धकांनी सादर केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या कार्याचा उजाळा स्पर्धक कलावंतांनी जलसातून सादर केला. दयानंद कला महाविद्यालयाच्या प्रियंका बनसोडे हिने गायलेल्या ‘वंदितो बा भीमा तुला’ ‘आहे कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला’ हा जलसा पहाडी आवाजातून सादर केला. या गीताला पसंती मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान जलसाच्या माध्यमातून मांडले. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर, भारतीय संविधान या विषयाला उजाळा दिला. यामध्ये आरती सांगवे, विशाखा गिरी, धम्मदीप सपकाळ, किरण कांबळे, ओमकार गायकवाड, अभिजीत सुतार या स्पर्धकांची साथ मिळाली. दयानंद विधी महाविद्यालयाच्या अपेक्षा डाके या स्पर्धकांने ‘जीवन सुधारण्या भीमराव आला’ हा जलसा गाऊन सादर केला. दयानंद कला महाविद्यालय लातूरच्या स्पर्धकांनी विचारांचा जलसा सादर करत व्हाट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियामुळे मानव कसा व्यस्त झाला आहे. हे दाखवून दिले. माणूस प्रबोधन कार्यक्रमापासून दूर चालत असल्याची खंत व्यक्त केली. या जलसात अनमोल कांबळे, श्रीनिवास बिरदेव, रोहन गायकवाड, संदीप भोरे, वैष्णवी नाडे, स्नेहा शेवाळे, आदींचा सहभाग होता. वैष्णवी जगदाळे, दिव्या थोटे, अनिकेत चितळे, आनंद रामदासे इत्यादी यामध्ये सहभागी होते. श्री. शिवाजी महाविद्यालय कंधारच्या स्पर्धकांनी ‘दोनच राजे इथे जन्मले’ हा आंबेडकरी प्रबोधनात्मक जलसा सादर केला. या जलसामध्ये शाहीर घनश्याम पेटकर, विशाल वरपडे, अमोल वानखेडे, प्रिया कदम, रोहिणी लोंढे, सरस्वती वाघमारे, दिगंबर वंजे यांचा सहभाग होता.

यावेळी यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, युवक महोत्सवाचे आयोजक प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर, प्राचार्य डॉ. सुनील हंबर्डे, डॉ.सोमनाथ पचलिंग, प्रा. प्रवीण मुळीक, डॉ. मामा जाधव, डॉ.कमलाकर चव्हाण, डॉ. ज्ञानदेव राऊत, डॉ. विजय भोपळे, डॉ. दिलीप पाईकराव, डॉ. रामचंद्र भिसे, डॉ.बालाजी भंडारे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ ज्ञानदेव राऊत यांनी केले.

——————————————————————————————————————–

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.