एम सी आर
Uncategorized

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात क्रीडा संचालकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेला उत्साहात प्रारंभ

नांदेड: (30 गुरुवार जुलै 2026)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयांतील क्रीडा संचालकांसाठी “Three-Day Workshop for Directors of Physical Education and Sports” या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि.२८ ते ३० जुलै दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यशाळेला आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला असून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील क्रीडा संचालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, अधिसभा सदस्य डॉ. दीपक बच्चेवार, डॉ. महेश बेंबडे, क्रीडा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास पाळणे तसेच कार्यशाळेचे आयोजन सचिव व विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात डॉ. प्रवीण डाबरे (जळगाव) यांनी “Best Practices in Sports Administration” या विषयावर मार्गदर्शन केले. क्रीडा प्रशासनातील आधुनिक संकल्पना, प्रभावी नियोजन, व्यवस्थापन आणि उत्कृष्ट कार्यपद्धती याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
ही कार्यशाळा सलग तीन दिवस विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून, क्रीडा क्षेत्रातील नवीन धोरणे, प्रशासन, व्यवस्थापन आणि गुणवत्ता वृद्धी याविषयी सहभागी क्रीडा संचालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेला सर्व महाविद्यालयांतील क्रीडा संचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील संजयसिंह ठाकूर, शिवाजीराव हंबर्डे, राम किरकन, सुनील लुटे आणि रतनसिंग पुजारी आदी विशेष परिश्रम घेत असून कार्यशाळेचे नियोजन व व्यवस्थापन उत्कृष्टरीत्या पार पाडले जात आहे.
——————————-

Share

Related posts

मराठवाड्यात विकासाची मोठी सुप्तशक्ती” – ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी

Chief Editor

मितभाषी, संयमी व भाषिक अहिंसामय: डॉ.अशोक सिद्धेवाड (लेखक:डॉ. अजय गव्हाणे)

Chief Editor

प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांना अयोध्या येथील त्रेतायुग फाउंडेशनचा ‘नॅशनल प्राईड अँड एक्सलन्स अवॉर्ड 2026’ जाहीर

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Chief Editor

मंत्रालयातील कथित कर्मचाऱ्यांचा आगळा-वेगळा प्रताप..! शासकीय नोकरीत असूनही पदाचा गैरवापर करून मानसिक त्रास; डॉ. निलेश बास्टेवाड यांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

Chief Editor

Leave a Comment