एम सी आर
Uncategorized

परभणीत ‘शंकर गंधम सर स्मृती जिल्हास्तरीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा’ उत्साहात संपन्न

परभणी: (डॉ.प्रवीणकुमार सेलुकर)
समर्थ चेस अकॅडेमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘शंकर गंधम सर स्मृती जिल्हास्तरीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्वर्गीय शंकर गंधम सर यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाला अभिवादन म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला बुद्धिबळपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परभणी जिल्ह्यासह वाशिम, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमधून तब्बल १८३ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. विविध वयोगटांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी आपल्या बुद्धिबळ कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

स्पर्धेचे उद्घाटन डॉ. निलेश पवार, इंजि. अमोल इखे आणि मुख्य पंच डॉ. दिपक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच व समर्थ चेस अकॅडेमीचे संचालक श्री. अनुराज रासकटला यांच्या नियोजनातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात डॉ. अंकित मंत्री यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना एकूण १८ हजार रुपयांची रोख पारितोषिके आणि ६० आकर्षक ट्रॉफीज प्रदान करण्यात आल्या.

या स्पर्धेमुळे परभणी आणि परिसरातील नवोदित बुद्धिबळपटूंना स्पर्धात्मक अनुभव घेण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले. बुद्धिबळाच्या प्रसारासाठी सातत्याने उपक्रम राबविणाऱ्या अनुराज रासकटला यांच्या आयोजनाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

बुद्धिबळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम आणि निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

Share

Related posts

म.ज्योतिबा फुले हे महान क्रांतिकारक समाज सुधारक होते – प्रा. राहुल पुंडगे

Chief Editor

माता रमाई यांच्या त्यागामुळे कोटी कोटी कुळांचा उद्धार -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

तळागाळातील उपेक्षितांना न्याय मिळालाच पाहिजे”

Chief Editor

यशवंत मध्ये “भारत एन्व्हायरमेंट प्रोग्राम सप्ताहाचे” आयोजन

Chief Editor

यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

भक्ती आणि शक्ती हे आयुष्य जिंकण्याचे सूत्र – संजय भोसले

Chief Editor

Leave a Comment