एम सी आर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Uncategorized

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती‌

नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शनिवार, दि.१५ ऑगस्ट, २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. त्यानंतर ‘वंदे मातरम्’ गीताते सादरीकरण पार पडले. ध्वजारोहणा नंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीताचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले.

यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी उपस्थित विद्यापीठ परिवाराला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय क्षेत्रातील प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी एकजुटीने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन,कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. देशभक्तीपर वातावरण, राष्ट्रध्वजाची शान आणि विद्यापीठ परिवाराची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा उत्साहात पार पडला.

——————-

Share

Related posts

सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ मनोहर चासकर

Chief Editor

संपलाही नाही संपणार नाही माझ्या भिमाचा दरारा* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते डॉ. शिवराज शिंदे यांच्या भीम गीताचे विमोचन

Chief Editor

नांदेड जिल्हा धनगर समाजातर्फे ९ ऑगस्ट रोजी भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन

Chief Editor

लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणेला नवी दिशा

Chief Editor

पुस्तकप्रेमाकडून पुस्तक वेडाकडे नेणारा उपक्रम: यशवंत बिब्लियोफाइल्स!

Chief Editor

व्यवस्था बदलल्याशिवाय स्त्रीमुक्ती अशक्य – कॉ. किरण मोघे

Chief Editor

Leave a Comment