एम सी आर

जिल्हास्तरीय अविष्कार 2026-27 संशोधन स्पर्धेचे आयोजन

Uncategorized

परभणी:प्रतिनिधी
नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आविष्कार २०२६-२७ संशोधन स्पर्धेचे आयोजन दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी UG, PG आणि PPG हे तीन लेवल आहेत आणि सहा कॅटेगिरी मध्ये सहभाग नोंदवता येऊ शकतो. या संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सर्व इच्छुक महाविद्यालयाने सूचना पाहून omprabhalohakare@gmail.com या ईमेलवर दि. ०१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपल्या प्रवेशिका पाठवाव्यात व आपल्याला पाठवण्यात आलेल्या पत्रिकेमध्ये दिलेला गुगल फॉर्म भरावा.

या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना पुढे विद्यापीठ स्तरीय संशोधन महोत्सव मध्ये सहभागी केले जाते.
या स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी केले आहे.
तरी परभणी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संपर्क:
डॉ. ओमप्रभा लोहकरे ९९७५१०८२०४ (परभणी जिल्हा समन्वयक) डॉ. संगीता लोमटे ९४०५३४३७०६, डॉ. दिनेश धनेश्वर ९८२३३३९८९० आणि प्रा. कांचन शर्मा ९९७५२९९२६८ यांच्याशी संपर्क करावा.

Share

Related posts

सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी

Chief Editor

अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख दत्ता कल्याणकर Employee Of The Month पुरस्काराने सन्मानित

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठामध्ये महाड सत्यागृह शताब्दी व जयंती महोत्सव उत्साहात

Chief Editor

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाचे आयोजन

Chief Editor

मुक्त विद्यापीठाच्या रोजगार मेळाव्यात शेकडो युवकांना नोकरीची संधी (३५ नामांकित कंपन्यांचा सहभाग — पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे)

Chief Editor

दिव्यांगाच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी वेळोवेळी बैठकितील प्रोसिडींगमधील प्रश्नांची सोडवणुक व वरीष्ठाच्या आदेशाची पंधरा दिवसांत अंमलबजावणी नाहि झाल्यास हदगाव तहसिलदार साहेब यांच्या दालनात स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत आंदोलनाचा निवेदनाद्वारे दिला ईशारा

Chief Editor

Leave a Comment