एमजीएम महाविद्यालयाच्या ५०० विद्यार्थ्यांची आयलाईक (iLIKE) कोर्सेस साठी नोंदणी प्रा अजित तुकाराम भोसले यांचा उत्कृष्ट प्राध्यापक समन्वयक म्हणून गौरव
नांदेड:
एमजीएमच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नांदेड येथे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आयलाईक (iLIKE) कोर्सेस साठी तब्बल ५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी करून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
या विशेष कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या टीमने एमजीएम कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या टीम मध्ये महेश पत्रीके (रीजनल कॉर्डीनेटर), पंढरीनाथ आघाव (चिफ मॅटोर एमकेसीएल, नांदेड), गणेश घुगे (रीजनल मॅनेजर), आलोक मालु (ILIKE रीजनल कॉर्डीनेटर), आकाश ढगे (जिल्हा समन्वयक) आणि मुकेश अडचित्रे (जिल्हा समन्वयक) यांचा समावेश होता.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एमजीएम कॉलेजचे प्रा. अजित तुकाराम भोसले यांना एमकेसीएल उत्कृष्ट आयलाईक (iLIKE) प्राध्यापक समन्वयक पुस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना प्रा. अजित तुकाराम भोसले यांनी या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे, सर्व विभागप्रमुख तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याला दिले. त्यांच्या सहकार्याशिवाय ही महत्त्वपूर्ण कामगिरी आणि हा मौलाचा दगड गाठणे शक्य झाले नसते, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी आयलाईक (iLIKE) कोर्सेस साठी मोठ्या संख्येने नोंदणी करून दाखविलला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाविद्यालयातील डिजिटल कौशल्यविकास, रोजगाराभिमुख शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे देयक आहे.
या उल्लेखनीय व अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. कमलकिशोर कदम, संचालिका डॉ. गीता लाठकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे, उपप्राचार्या डॉ. कांचन नांदेडकर, बीसीए विभागप्रमुख डॉ. स्मिता भोपी, बीटी व बीआय विभागप्रमुख डॉ. मकरंद घेरेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
