एम सी आर

डॉ.पंजाबराव देशमुख बहुआयामी व्यक्तिमत्व या विषयावर व्याख्यान संपन्न

Uncategorized

परभणी: प्रतिनिधी
दिनांक २८ सप्टेंबर २०२६ सोमवार रोजी कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी व विज्ञान महाविद्यालय पवनी जिल्हा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ” स्व. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख:
बहुआयामी व्यक्तिमत्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे, कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी यांचा शाॅल, श्रीफळ, डॉ. पंजाबराव देशमुख यांची प्रतिमा व गौरवग्रंथ देऊन कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य डॉ. सुनिल देशमुख, प्राचार्य विज्ञान महाविद्यालय, पवनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मराठी विभाग कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाकडून कमलवार्षिकांक व मायेची सावली हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.प्रा. डॉ. आशा गिरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाला डॉ. रामप्रसाद देशमुख, प्राध्यापक, शिवाजी महाविद्यालय परभणी हे प्रमुख वक्ता म्हणून लाभले. डॉ. रामप्रसाद देशमुख, यांनी आपल्या भाषणा मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषी व शिक्षण विषयक केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. अविनाश अणे यांनी मनोगत व्यक्त केले प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे,यांनी
अध्यक्षीय समारोप करताना
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व विज्ञान महाविद्यालय पवनीचे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक करत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश घनसावंत व आभार डॉ. संजय घुगल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुभाषचंद्र पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयतील प्राध्यापक, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share

Related posts

बहुजनांचे सुराज्य बनविणारे – छत्रपती शिवाजी महाराज

Chief Editor

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे, मुंबईच्या खेळाडूंनी गाजविले मैदान : महापौरांच्या हस्ते बक्षिक वितरण थाटात संपन्न

Chief Editor

सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी

Chief Editor

बोधिसत्त्व नगर वाडी बुद्रुक येथे माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने अजय वसंतराव गव्हाणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

ने.सु.बो चा एनसीसी कॅडेट गणेश पिसाळ यांची सी.आर. पी.एफ मध्ये निवड

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये पर्यावरणशास्त्र ग्रंथाचे प्रकाशन

Chief Editor

Leave a Comment