एम सी आर

यशवंत ‘ मध्ये पर्यावरणशास्त्र ग्रंथाचे प्रकाशन

Uncategorized

नांदेड : (दि. ६ ऑगस्ट २०२६)
यशवंत महाविद्यालयातील प्रा.अरविंद शिंदे, प्रा.बाळासाहेब लांडगे आणि डॉ.चंद्रकांत घोरबांड यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ‘पर्यावरणशास्त्र’ या उपयुक्त संदर्भग्रंथाचे प्रकाशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
आजच्या बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीचा अभ्यास, पर्यावरण संवर्धनाची गरज आणि अभ्यासक्रमाशी सुसंगत माहिती या पुस्तकामध्ये सोप्या व विद्यार्थी-केंद्रित पद्धतीने मांडण्यात आली आहे. हे पुस्तक नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने बी.ए., बी.कॉम. आणि बी.एससी. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून स्पर्धा परीक्षा तसेच पर्यावरण विषयाच्या सखोल अध्ययनासाठीही मार्गदर्शक ठरेल.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी लेखकांचे अभिनंदन करताना, विद्यार्थ्यांना दर्जेदार व अभ्यासक्रमाभिमुख साहित्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे पुस्तक निश्चितच मोलाचे योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या उपयुक्त ग्रंथ लेखनाबद्दल लेखकांचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयीका डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ.बतुल्ला बालाजीराव, दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ.राजकुमार सोनवणे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

वटसावित्री पौर्णिमा उत्साहात; महिलांनी पतीच्या दीर्घायुष्य व कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी केले व्रत

Chief Editor

लेखन संस्कृतीला चालना देण्यासाठी श्री शारदा भवन हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये पर्यावरण संवर्धन, झिरो प्लास्टिक, ग्रीन कॅम्पस मिशनसाठी कृतिशील उपक्रम

Chief Editor

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सांगडीतूनच ऊर्जा स्त्रोतांची पुनर्निर्मिती शक्य – प्रो. री-ची मुराकामी

Chief Editor

माता रमाई महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पॅम्प्लेटचे उत्साहात उद्घाटन

Chief Editor

तळागाळातील उपेक्षितांना न्याय मिळालाच पाहिजे”

Chief Editor

Leave a Comment