एम सी आर
Uncategorized

यशवंत इमॅजिनेशिया : उत्सव कलांचा!’ कला प्रदर्शन उत्साहात संपन्न

नांदेड :

‘कला म्हणजे जीवनाच्या ओझ्याला दिलेला हलकासा आधार. हे लक्षात घेऊन’ उपक्रमशील व तंत्रस्नेही प्राध्यापक डॉ.विश्वाधार देशमुख यांच्या संकल्पना-समन्वयातून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने ‘कला आणि पुस्तकं-जी मुक्त करतात’ हे मध्यवर्ती सूत्र घेऊन यशवंत महाविद्यालयात वाचन कट्टा-कला कट्ट्याच्या वतीने ‘यशवंत इमॅजिनेशिया-उत्सव कलांचा!’ या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचे प्राथमिक कर्तव्य म्हणजे अभ्यास; मात्र त्यासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

‘इमॅजिनेशिया कल्पनेतून साकारलेली दुनिया!’ ही या उपक्रमामागची मुख्य संकल्पना. माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची कल्पनाशक्ती. कल्पनांना कोणत्याही मर्यादा नसतात आणि त्या कल्पनांना कलाकृतीचे रूप देण्यासाठी कला हे प्रभावी माध्यम ठरते.

‘यशवंत इमॅजिनेशिया’मध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या तब्बल १५१ कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. रेखाचित्रे,फोटोग्राफी,विणकाम, मृदमुर्तीकला,क्रोशे, हस्तनिर्मित वस्तू अशा अनेकविध कलाप्रकारांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना आकार दिला होता.

प्रदर्शन पाहून भारावलेले डॉ.नितीन जोशी उद्घाटकीय मनोगतात म्हणाले की,’सकाळी आठ वाजता महाविद्यालयात एवढ्या सुंदर कलाकृती आणि त्या सादर करणारे उत्साही विद्यार्थी पाहून हा अनुभव म्हणजे ‘माझ्या मागील अनेक वर्षांतील सर्वात सुंदर सकाळ’ असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांची गुणवत्ता केवळ गुणपत्रिकेतील आकड्यांत नाही तर ती त्यांना पडणाऱ्या प्रश्नांत,कल्पनांत, अभिव्यक्तीत आणि काहीतरी नवे निर्माण करण्याच्या प्रयत्नांत दिसते असेही ते म्हणाले.’ त्यांनी ‘विद्यार्थ्यांचे आणि हा उपक्रम सातत्याने पुढे नेणारे तथा विद्यार्थी हितासाठी सदैव धडपडणारे उपक्रमशील व तंत्रस्नेही डॉ.विश्वाधार देशमुख यांचे अभिनंदन केले तसेच भविष्यातही या उपक्रमाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.’ महाविद्यालयाचे प्राचार्य गणेशचंद्र शिंदे यांनी अध्यक्ष म्हणून उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ.संजय जगताप यांच्यासह महाविद्यालयातील कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील अनेक प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोदावरी कानशुक्ले, प्रास्ताविक शिवानी कार्लेकर आणि आभार प्रदर्शन गौरी शिंदे यांनी केले.

या कला प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी हिंदवी जाधव,कृष्णा गव्हाणे,जर्मिन शेख,पूनम भोसले,लक्षदीप सावते, ऋषिकेश तेलंग,केतन कपाटे, स्नेहा गायकवाड,प्रज्ञा इंगोले, अंजली मद्रेवार,दुर्गा देशमुख, मयूर धुतूरे,राधा कराड, अदिती भालेराव, मोहिनी लिंगायत,विश्वजित परमार,विद्या पांचाळ,संकेत कदम,श्रेया जाधव, नेहा व स्नेहा हाटेले,हेमा वाघमारे, संजीवनी मोकले,वसुंधरा रूईकर, समीक्षा वाघमारे, संविधान कांबळे अशा अनेक विदयार्थ्यांनी परिश्रम घेतले.

महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह दैनिक प्रजावाणीचे संपादक श्री शंतनू डोईफोडे,शिवाजी अंबुलगेकर, स्वराज अंबुलगेकर, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.मारोती गायकवाड,प्रसिद्ध व्यावसायिक श्री वसंत मैया, कविता जोशी, शिवाजीराजे बाभळीकर यांच्यासह अनेक आजी-माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे प्रदर्शनातील विद्यार्थी कलावंतांना मोठी प्रेरणा मिळाली.

Share

Related posts

नांदेड शहरात 15 व 16 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘जागतिक आरोग्य दिना’निमित्त आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई पिंपळगाव फाटा शिवारात जुगार व मटका हद्द्यावर धाड दहा जनावर गुन्हा दाखल एक लाखाचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोज

Chief Editor

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे, मुंबईच्या खेळाडूंनी गाजविले मैदान : महापौरांच्या हस्ते बक्षिक वितरण थाटात संपन्न

Chief Editor

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून धनगर समाजात शैक्षणिक चळवळीला बळ

Chief Editor

Leave a Comment