एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये शोधचक्र प्रणालीवर ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन

नांदेड: (दि.८ मार्च २०२६)
संशोधन क्षेत्रातील आधुनिकता आणि सुसूत्रता लक्षात घेऊन, यशवंत महाविद्यालयाने संशोधक, मार्गदर्शक आणि प्राध्यापकांसाठी ‘शोधचक्र’ संशोधन कार्यप्रणाली व्यवस्थापन प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांचे मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली इन्फ्लिबनेट सेंटर, गांधीनगर, गुजरात व यशवंत महाविद्यालय ग्रंथालय यांच्यावतीने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संशोधकांसाठी डिजिटल व्यासपीठ ‘शोधचक्र’ हे प्लॅटफॉर्म संशोधनाच्या सुरुवातीपासून ते प्रबंध सादर करण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर संशोधक विद्यार्थी आणि त्यांच्या पर्यवेक्षकांना तांत्रिक सहाय्य करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या सत्राचा मुख्य उद्देश संशोधन कार्याचे अचूक व्यवस्थापन करणे, कामाच्या प्रगतीचा मागोवा घेणे आणि शैक्षणिक नियमांचे व गरजांचे पालन करणे, याविषयी सविस्तर माहिती देणे हा आहे.
सत्राचे नियोजन आणि नोंदणी हे प्रशिक्षण सत्र११ मार्च रोजी सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत गूगल मीट ऑनलाइन माध्यमातून पार पडणार आहे.
या कार्यक्रमात प्राध्यापक, संशोधन मार्गदर्शक, संशोधक विद्यार्थी आणि नोडल अधिकारी तथा ग्रंथपाल यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नोडल अधिकारी तथा ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे यांनी केले आहे..
संशोधन कार्याला गती देण्यासाठी आणि तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Share

Related posts

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी

Chief Editor

उपवर्गीकरणाचा तिढा सोडवण्यासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा – सुरेशदादा गायकवाड

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात क्रीडा संचालकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेला उत्साहात प्रारंभ

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये ‘MY Bharat’ विद्यार्थी विशेष नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

यशवंत मध्ये इंग्रजी इंडक्शन प्रोग्राम यशस्वी संपन्न

Chief Editor

कै सौ कमलताई जामकर महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमाचे आयोजन 

Chief Editor

Leave a Comment