एम सी आर

यशवंत ‘ मधील कॅडेट्सची दार्जिलिंग राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

Uncategorized

नांदेड :दि(२ मे २०२६)
यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स बापूराव नवरखेले, निशा तेलंगे आणि संजना कांबळे यांची दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबीरासाठी निवड झाली आहे
या निवडीबद्दल माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी एनसीसी कक्षाचे कौतुक करून कॅडेटसचा यथोचित सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या आहेत तसेच यशवंत महाविद्यालयातील असंख्य एनसीसी कॅडेट्सना भारतीय लष्कर, वायुसेना, नौदल यामध्ये सेवा करण्याची नोकरी करण्याची संधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर आणि जीसीआय प्रियंका सिसोदिया यांची उपस्थिती होती.
दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) येथील राष्ट्रीय शिबिर ५ मे पासून सुरू होत आहे. या ट्रेकिंग कॅम्पचा उद्देश कॅडेट्समध्ये आत्मविश्वास जागृत करणे आणि त्यांना विविध वातावरणातील आव्हानांशी मुकाबला देण्यासाठी तयार करणे; हा आहे. एनसीसी ट्रेकिंगमध्ये पर्वत चढणे, वेगवेगळ्या प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धा तसेच अनेक उपक्रमांचे आयोजन करते.
या निवडीबद्दल डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, पर्यवेक्षिका प्रा.वंदना बदने, डॉ. एल. व्ही. पद्माराणी राव, डॉ. साहेब शिंदे, प्रा.माधव दुधाटे, लेफ्टनंट डॉ. रामराज गावंडे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.एम.एम. व्ही.बेग, प्रा. ओमप्रकाश गुंजकर, डॉ.वीरभद्र स्वामी, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अभय थेठे, जगन्नाथ महामुने आदींनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

यशवंत ‘मध्ये दुग्धशास्त्र विभागाचा इंडक्शन प्रोग्राम संपन्न

Chief Editor

डेरला गावातील शेतकरी गजानन काळे यांच्या चार एकर वरील ऊस जळून खाक,लाखो रूपयांचे नुकसान..

Chief Editor

नांदेडमध्ये १२ ऑगस्टपासून राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २७० खेळाडूंचा सहभाग; सलग २२ वर्षांची परंपरा कायम — सुंदर शेट्टी यांना जीवनगौरव पुरस्कार

Chief Editor

अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये ९ ऑगस्ट रोजी अनुसूचित जातीतील ५९ जातीचा महामोर्चा

Chief Editor

यशवंत ‘ मधील रामेश्वर जाधव यांना अर्थशास्त्रात पीएच.डी. प्रदान

Chief Editor

भाग्यनगर साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिवस उत्साहात; डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वाटचाल आवश्यक – गजानन बिडकर यांचे प्रतिपादन.

Chief Editor

Leave a Comment