एम सी आर

महात्मा फुले यांच्या जन्माच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त यशवंत महाविद्यालयात ‘फुले’ चित्रपटाचे खास प्रदर्शन!

Uncategorized

नांदेड :

‘अविद्येच्या दोषांचे दुष्परिणाम दाखवून बहुजन समाजाला विद्येच्या दिशेने घेऊन येणारे कर्ते समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्माचे द्विशताब्दी वर्ष सुरु झाले. यानिमित्ताने यशवंत महाविद्यालयातील वाचन कट्ट्याच्या वतीने अनेकविध उपक्रमांचे नियोजन आहे.
याचाच एक भाग म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मोठेपणाचे मर्म उलगडून दाखवणारा अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा बहुचर्चित चित्रपट अभिरुची फिल्म क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.

पदवी द्वितीय आणि तृतीय वर्ष वर्गाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या अमूल्य योगदानाची नोंद घेणारा अभ्यास घटक समाविष्ट आहे. प्रस्तुत घटक समजून विद्यार्थ्यांना मदत व्हावी हादेखील या आयोजनामागील हेतू होता.

प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांच्या प्रेरणेतून उपक्रमशील अध्यापक डॉ.विश्वाधार देशमुख यांच्या संकल्पना समन्वयातून अभिरुची फिल्म क्लबच्या कार्यकारिणीने पदवी द्वितीय आणि तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांसाठी या चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन केले होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी फिल्म क्लबच्या उपाध्यक्ष दुर्गा देशमुख,सचिव ऋषी तेलंग, सहसचिव प्रीती बर्डे, राजनंदिनी सुरेवाड, समीक्षा सावते तसेच कृष्णा गव्हाणे,हिंदवी जाधव, जर्मिन शेख यांनी परिश्रम घेतले.

फुले दांपत्याच्या जीवन कार्याचा ऐतिहासिक पट उलगडून दाखवणारा प्रस्तुत चित्रपट पाहण्यासाठी प्राध्यापक,पालक प्रतिनिधी यांच्यासह कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related posts

शेतकऱ्याच्या मुलांची गरुड झेप :आर्मी मध्ये लेफ्टनंट हे पद संपादन

Chief Editor

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स :योगा करणे का गरजेचे आहे

Chief Editor

यशवंत ‘मध्ये टीबी मुक्त भारत अभियान जनजागृती संपन्न

Chief Editor

भगवान रजनीश संबोधी दिनी सक्रिय ध्यान अभियान समारोप सोहळा

Chief Editor

मालेगावात दिवसाढवळ्या चोरी; शिवशक्ती ज्वेलर्स मालकाची बॅग लंपास

Chief Editor

यशवंत ‘ मधील मुलांच्या वस्तीगृहात इंडक्शन प्रोग्राम संपन्न

Chief Editor

Leave a Comment