एम सी आर

मालेगावात दिवसाढवळ्या चोरी; शिवशक्ती ज्वेलर्स मालकाची बॅग लंपास

Uncategorized

नांदेड:

मालेगाव शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून,दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील शिवशक्ती ज्वेलर्स या दुकानाच्या मालकाची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशक्ती ज्वेलर्सचे मालक सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले होते.त्यांनी दुकान उघडून बॅग आत ठेवली आणि देवदर्शनासाठी बाहेर गेले. दरम्यान, त्यांच्या वडिलांकडून दुकानात साफसफाई सुरू असताना दोन अज्ञात इसम दुकानात आले. त्यापैकी एकाने पत्ता विचारत त्यांना संभाषणात गुंतवून ठेवले,तर दुसऱ्याने संधी साधत क्षणार्धात बॅग उचलून पळ काढला.
ही संपूर्ण घटना अतिशय वेगाने घडल्याने कोणालाही तत्काळ संशय आला नाही. चोरीची बाब लक्षात येताच तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले.माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे मालेगावातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. व्यापाऱ्यांनी शहरात पोलीस गस्त वाढवावी,तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे,अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी तसेच दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्याकडे लक्ष ठेवतील अशा पद्धतीने बसवावेत,असेही सांगण्यात आले आहे.

Share

Related posts

विद्यार्थीप्रिय आदर्श प्राध्यापक: प्रा. डॉ. वसंत गुरव :

Chief Editor

महामानव लोकशाहीर, साहित्यरत्न, डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

Chief Editor

घरफोडी प्रकरणातील आरोपी १२ तासांत जेरबंद; १९.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स :योगा करणे का गरजेचे आहे

Chief Editor

ज्ञानदानातून वाढदिवस साजरा – एक वेगळी आणि प्रेरणादायी परंपरा!

Chief Editor

प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे सागरी जलतरण स्पर्धेतील सुयश आनंददायी -माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

Chief Editor

Leave a Comment