एम सी आर

ज्ञानदानातून वाढदिवस साजरा – एक वेगळी आणि प्रेरणादायी परंपरा!

Uncategorized

नांदेड : समाजाप्रती असलेली जाणीव आणि सामाजिक बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे यांनी पुन्हा एकदा आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत ज्ञानदानाचा उपक्रम राबवला. यंदाही त्यांनी पीपल्स महाविद्यालय, नांदेड तसेच विद्यापीठाच्या ग्रंथालयास कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्राचार्य डॉ. भानेगावकर यांच्याकडे विविध उपयुक्त ग्रंथ सुपूर्द करून वाढदिवस साजरा केला. डॉ. मोरे यांची वाढदिवस साजरा करण्याची ही अनोखी परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. दरवर्षी ते आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवतात. यापूर्वी त्यांनी पूरग्रस्तांना आर्थिक मदत, कोरोनाग्रस्तांना सहाय्य, तसेच “मुख्यमंत्री सहाय्यता निधी COVID-19” मध्ये निधी देऊन आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. विशेषतः कोरोना काळात, जेव्हा महाराष्ट्रात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती, त्या वेळी त्यांनी गरजू लोकांना आर्थिक व मानसिक आधार देण्याचा मोलाचा प्रयत्न केला.

तसेच, आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना ‘सकाळ रिलिफ फंड’च्या माध्यमातून आर्थिक मदत देऊन त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 संदर्भातही डॉ. मोरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. देशभरातील विविध नामांकित संस्थांमध्ये त्यांनी या विषयावर व्याख्याने देत शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. गतवर्षी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त “उच्च शिक्षण धोरण : आव्हाने आणि दिशा” या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे तसेच माजी शिक्षण मंत्री डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यंदाच्या ग्रंथदान कार्यक्रमावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, डॉ. हनुमंत कंधारकर, ग्रंथपाल डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब शिंदे, डॉ. दिगंबर कदम, डॉ. संदीप गायकवाड, डॉ. रवी सरोदे आणि डॉ. संदीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मोरे यांच्या या उपक्रमामुळे “वाढदिवस म्हणजे केवळ आनंदाचा दिवस नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी” हा संदेश समाजात पोहोचत असून, त्यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

Share

Related posts

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये एनसीसी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Chief Editor

विद्यार्थीप्रिय आदर्श प्राध्यापक: प्रा. डॉ. वसंत गुरव :

Chief Editor

तहसिलदार* पांडूरंग माचेवाड यांच्या हस्ते सोमवारी तहसिल प्रांगणात शासकीय ध्वजारोहन

Chief Editor

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई पिंपळगाव फाटा शिवारात जुगार व मटका हद्द्यावर धाड दहा जनावर गुन्हा दाखल एक लाखाचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

स्वच्छ यशवंत परिसर अभियान उत्साहात संपन्न

Chief Editor

Leave a Comment