एम सी आर

स्वच्छ यशवंत परिसर अभियान उत्साहात संपन्न

Uncategorized

*
नांदेड :(दि. १५ ऑगस्ट २०२६)
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वच्छ यशवंत समितीतर्फे यशवंत महाविद्यालय येथे ‘स्वच्छ यशवंत परिसर’ अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला.
या अभियानात माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे अध्यक्ष प्रा. साहेबराव माने, सदस्य डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ.साईनाथ बिंदगे, प्रा. नारायण गव्हाणे, डॉ.रोहिणी चव्हाण, डॉ. बालाजी भोसले व डॉ. ज्ञानेश्वर पुपुलवाड उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा संकलित केला. स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करावी, असा संदेश प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी दिला.
अभियानाच्या यशस्वीतेसाठी शंकर मिरेवाड, परमेश्वर राठोड,जगदीश उमरीकर आणि प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे ‘स्वच्छ यशवंत परिसर’ अभियान यशस्वीपणे पार पडले.

Share

Related posts

वसंतराव नाईक महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Chief Editor

ऊध्दव हरकाळ यांचा अल्काताई सोळंके, सोरेकर यांच्या हस्ते सत्कार.

Chief Editor

जातीनिरपेक्ष व धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व : डॉ.गौतम दुथडे* (-लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

महात्मा फुले यांचे क्रांतिकारकत्व:-डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

पुन्हा हवेत महात्मा गांधीजी : डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

Leave a Comment