एम सी आर
Uncategorized

प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे सागरी जलतरण स्पर्धेतील सुयश आनंददायी -माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

नांदेड (दि. ५ मे २०२६)

प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे चेन्नई येथील सागरी जलतरण स्पर्धेतील सुयश आनंददायी असल्याची भावना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.खा.श्री.अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली तसेच भविष्यातील स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यशवंत महाविद्यालयातील उत्कृष्ट जलतरणपटू समाजशास्त्र विभागातील प्रा. ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांनी बंगालचा उपसागर, चेन्नई येथील ट्रायटूचॅम्प स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशिप सागरी १००० मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक पटकावले आहे.

या दैदीप्यमान सुयशाबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.खा.श्री.अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, श्री. किशोर स्वामी, स्वीय सहाय्यक साहेबराव भालेराव तसेच इतर अभ्यागतांची उपस्थिती होती.

या सुयशाबद्दल माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी कौतुक केले तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कबीर रबडे, पर्यवेक्षिका प्रा.वंदना बदने, डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. एल. व्ही. पदमारानी राव, डॉ.साहेब शिंदे, प्रा. माधव दुधाटे, डॉ. विरभद्र स्वामी, डॉ. मीरा फड, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, अभय थेटे, नवनाथ धुमाळ, ज्ञानेश्वर डोंगरे, प्रा.नरेंद्र कंचटवार, डॉ. संगीता मसारे, प्रा.श्रीकांत सोमठाणकर, डॉ.बी.जी.देशमुख, डॉ.एकनाथ मिरकुटे, प्रा.सचिन अपस्तंभ, डॉ.मुकेश धर्मले, डॉ.श्रीरंग बोडके, सेवानिवृत्त वन अधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर, बालाजी गाडे, प्रा. एस.डी. बोकारे, प्रा.एम. एस. कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

प्राचार्य बाबाराव नरवाडे, शंकर नरवाडे यांना मातृशोक रेणुकाबाई सटवाजी नरवाडे खुरगावकर यांचे वृद्धापकाळाने निधन

Chief Editor

मानवत येथील डॉ. राशी लड्डा हिचा नवा विश्वविक्रम

Chief Editor

*शाश्वत विकासासाठी युवक – जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास शिबीराचे जग्गुनाईक तांडा येथे उद्घाटन संपन्न* ()

Chief Editor

२३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचा जागर आणि जल्लोष

Chief Editor

कै सौ कमलताई जामकर महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमाचे आयोजन 

Chief Editor

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स :योगा करणे का गरजेचे आहे

Chief Editor

Leave a Comment