एम सी आर
Uncategorized

पद्मश्री डॉ.स्मिता रविंद्र कोल्हे यांना सन २०२४- २५ या वर्षीचा कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार जाहीर.

नांदेड: (डॉ. प्रवीणकुमार सेलूकर)
परभणी येथील कै.सौ.कमलताई जामकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा दर्पण पुरस्कार- मेळघाटच्या आदीवासी बांधवांना अविरत रुग्णसेवा देणाऱ्या थोर समाजसेविका पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे यांना.सन २०२४-२५ या वर्षासाठी दिला जाणारा कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार दर्पण पुरस्कार निवड समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री भारतभूषण रावसाहेब जामकर यांनी आपल्या सुविद्य पत्नी कै.सौ.कमलताई जामकर यांच्या निधना नंतर त्यांच्या नावे
सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलेला दर्पण पुरस्कार देण्याचे ठरविले . तेव्हापासून आजतागायत ही परंपरा सुरू आहे. पुरस्काराचे हे २३ वे वर्ष असून यापूर्वी साहित्यिक रेखा बैजल , डॉ. वृषाली किन्हाळकर , डॉ.मेबल आरोळे ,अनाथांची माता सिंधुताई सपकाळ, डॉ.राणी बंग , डॉ. हेमलता पाटील ,ॲड.सुरेखा दळवी , कु. नसीमा म हुरजूक, सौ. वैशाली पाटील , सौ.प्रतिभा शिंदे , डॉ.मंदाताई आमटे ,श्रीमती मायाताई सोरटे, श्रीमती रेहमतबी करीम बेग मिर्झा , श्रीमती सुमनसिंह चव्हाण व श्रीमती मिठू देवी ,सौ.सुलोचना कडू , आंतरराष्ट्रीय स्तरावर मा.इ.टी.नेपाल च्या श्रीमती अनुराधा कोइराला , डॉ.ज्योत्स्ना कुकडे , श्रीमती पिंजारी बाई उल्या पावरा , पद्मश्री राहीबाई सोमाजी पोपेरे , सौ. सुशीला विठ्ठलराव साबळे ,मनोरुग्णाची आई श्रीमती योजना घरत या मान्यवर महिलांना आता पर्यंत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन २०२४-२५ या वर्षीच्या पुरस्काराच्या मानकरी
समाजधुरीण पद्मश्री डॉ.स्मिता व रविंद्र कोल्हे यांनी १९८८ साली कोर्ट मॅरेज केले . डॉ .स्मिता रवींद्र कोल्हे या ध्येयवेड्या दांपत्याने सातपुडा पर्वतरांगातील बैरागड येथे आपल्या समाज सेवेला सुरुवात केली. गेल्या चार दशकांपासून मेळघाटातील बैरागड येथे आदिवासीं साठी एक रुपया डॉक्टर या निष्ठेने वैद्यकीय सेवा देत निरोगी समाज निर्माण कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
समाजातील अज्ञान ,
अंध:श्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे प्रबोधन पर जनजागरणाचे कार्य करत समृध्द समाज ,सक्षम व निरोगी मुली, महिला व माता , कुपोषित बालकांचे आरोग्याची काळजी घेत सदृढ बालक व
त्यांचा सर्वांगिण विकास , युवक – युवतीं च्या माध्यमातून समाज मनात विधायक विचारांची रुजवण व्हावी यासाठी मेळघाट पर्यटनातून समाज जीवनाचा अनुभव घेत तरुणाई च्या माध्यमातून सुजाण समाजाची जडणंघडणं करणारे शिबीरातून आदर्श समाज बांधणीचे कार्य सुरू केले.
डॉ .रवींद्र आणि डॉ.स्मिता ताईंच्या हाताला चांगला गुण येत असल्याने आदिवासी स्त्री – पुरुषांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्या बाबत. विशेषतः स्त्रियांनी अंध:श्रद्धा नाकारत स्वतःच्या आरोग्याची जाणिवपूर्वक काळजी घेत आपला आहार,आरोग्य, स्वच्छता,कुटुंबाचे पालन पोषण आदी जबाबदारी पार पाडताना स्वतः कडे लक्ष देत सबल व्हावे ही जाणिव वाढीस लागली.अहोरात्र सेवा समर्पणातून आदिवासींच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्याचे महान कार्य डॉ.स्मिता कोल्हे यांनी केले आहे.
आदिवासींचे जीवन प्रगत व्हावे म्हणून या दांपत्याने ग्राम विकास ,शिक्षण , स्वच्छता,आरोग्य ,शेती व इतर जोडधंदे करण्यासाठी आदिवासींना प्रेरित केले.
मेळघाटातील एके काळी एक हजारा मागे २०० मुले कुपोषणाचे बळी ठरत असतं. हे लक्षात घेत अन्न टंचाईवर मात करण्या साठी शेतात दुबार पिक घेणे, आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान विकसित करणे, शेती उत्पन्नात वाढ , कुटुंबाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी लागणारे अन्नधान्य , पैसा मिळविण्यासाठी श्रमाचे महत्त्व पटवून देत परंपरावादी आदिवासी समाजाला विधायक कार्यासाठी प्रेरित केले .
कुपोषण ,माता मृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे महान कार्य करत वसाडी या गावाचे नाव
भारत भर पोहचविले.
जल,जमीन,जंगल,पाणी जतन करत.निसर्गाशी एकरुप होणारा माणूस घडवत माणसाचे जीवन कसे सुखकर होईल या साठीचे कार्य केले.डॉ.स्मिता रविंद्र कोल्हे यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत दर्पण पुरस्कार समीतीचे अध्यक्ष हेमंतराव जामकर , उपाध्यक्ष ॲड.बाळासाहेब जामकर , सचिव विजयसिंह जामकर , सहसचिव अनिल मोरे यांनी कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार ( २०२४-२५ ) पद्मश्री डॉ.स्मिता रविंद्र कोल्हे यांना जाहीर करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share

Related posts

आर्यनचे जीवन क्षेत्र पुनर्संचयित करणाऱ्या प्रकल्पावर संशोधन

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘आयरिन्स व इन्फ्लिबनेट सेवा’ राष्ट्रीय कार्यशाळा

Chief Editor

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन

Chief Editor

नांदेड-किनवट मार्गावर भीषण अपघात : कार–दुचाकी समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

Chief Editor

शिबिरार्थी डॉ.अजय गव्हाणे संचालित ध्यानप्रयोगांनी ध्यानमग्न

Chief Editor

भारतीय गायन क्षेत्रातील तेजस्वी तारा…आशा भोसले*

Chief Editor

Leave a Comment