एम सी आर

प्रा. नारायण मोटे : सत्शील, प्रामाणिक व मृदू स्वभाव

Uncategorized

यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रा. नारायण पुंडलिकराव मोटे हे एक सत्शील, प्रामाणिक, मृदू स्वभावाचे व प्रत्येकास प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व होते. इंग्रजी विषयात त्यांचा हातखंडा वाखाणण्यासारखा होता. मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले, मार्गदर्शन केले.
सदैव स्मित हास्य हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग. महाविद्यालयाच्या प्रत्येक कार्यामध्ये मन लावून काम करणे, प्रत्येकास सहकार्य करणे व कसल्याही प्रकारचा नकारात्मक विचार मनात, चेहऱ्यावर आणि कार्यामध्ये न येऊ देणे; यामुळे सर सदैव स्मरणात राहतील.
वक्तशीरपणा हा कोणत्याही व्यक्तीने त्यांच्याकडून शिकावा. सदैव प्रसन्नता व लहान, मोठे, ज्युनिअर, सीनियर असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकास नमस्कार व प्रत्येकाची खुशाली विचारणे; या त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा दांडगा लोकसंपर्क आणि मित्रपरिवार असल्याचे आढळते. सरांनी यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पद भूषविले. इंग्रजी विषयाचे ते तज्ञ प्राध्यापक होते. उपप्राचार्य असताना देखील सत्तेचा बडेजावपणा त्यांनी कधीही मनात आणला नाही. ते पदावर आहेत; हे बऱ्याचदा कळतही नसे. इतरांना मी मोठ्या पदावर असल्याची जाणीव त्यांनी कधीही आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, अहंकारातून व्यक्त होऊ दिली नाही. त्यामुळेच सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांच्या आदरास ते सदैव पात्र ठरले. नियमांमध्ये राहून कार्य करणे व आपल्या पदाचा इतरांना कसा उपयोग होईल, सहकार्य होईल, मदत होईल; याचा विचार ते नेहमी करत असत. निराशा, नाराज, राग हे शब्द त्यांच्यापासून कोसो दूर राहात.
महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर, नांदेड येथील सहशिक्षण श्री. प्रसाद नारायणराव मोटे यांचे ते वडील आहेत. अपत्यांवर योग्य संस्कार करून परिश्रम, नैतिक, योग्य मार्गाने चरितार्थ करण्याचा त्यांचे मार्गदर्शन फलदायी व उपयुक्त ठरले आहे. त्यांचे अकरावीचे विद्यार्थी प्रत्येक वेळी त्यांची आठवण काढत असत. जवळपास पंचवीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही सरांना ते विसरले नाहीत. मरावे परी, किर्तीरुपी उरावे; या वाक्याची प्रचिती सरांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर दिसून येते.
प्रत्येक शैक्षणिक, शिक्षणेतर, शिक्षणपूरक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. साधी राहणी; उच्च विचारसरणी हे तत्व त्यांनी सदैव उराशी जोपासले. साधी वेशभूषा आणि हातात एक छोटी बॅग; त्यामध्ये नोट्स, पुस्तके आणि चेहऱ्यावर हसू व नेहमी दोन्ही हात जोडलेले; ही त्यांची मुद्रा कायम मनात ठसलेली राहील. स्मित हास्य हे सगळ्या प्रश्नावर रामबाण उत्तर आहे; याचे गमक त्यांना उमजले होते. अनावश्यक, बेताल वक्तव्य, लूज टॉकिंग व देखाव्यासाठी संपत्तीच्या मागे ते कधीही लागले नाहीत.
सरांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची खूप मोठी हानी झालेली आहे. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
-डॉ.अजय गव्हाणे,
यशवंत महाविद्यालय, नांदेड

Share

Related posts

श्री चक्रधर स्वामी हे मानवतेचे प्रेरणास्त्रोत -प्राचार्य डॉ.मा.मा.जाधव

Chief Editor

अभिरुची आस्वाद’ मध्ये ऑस्करसाठी नामनिर्देशित झालेल्या ‘कवी’ या लघुपटाचे प्रदर्शन

Chief Editor

यशवंत ‘मध्ये रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

Chief Editor

‘यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात तीन कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

Chief Editor

वसंतराव नाईक महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

Chief Editor

Leave a Comment