एम सी आर

यशवंत महाविद्यालयात गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम; विद्यार्थ्यांना सुरक्षित गुंतवणुकीचे मार्गदर्शन

Uncategorized

नांदेड : यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम (Investor Awareness Program) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड तसेच विविध वित्तीय साधनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा माजी प्र. कुलगुरू डॉ. जी. एन. शिंदे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून सेबीच्या नागपूर शाखेचे अधिकारी श्री. सुशांत मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्रमुख उपस्थिती म्हणून सेबीच्या ट्रेनर व गुंतवणूक सल्लागार डॉ. सारिका लोहाना उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय मूठठे यांनी केले.

या प्रसंगी श्री. सुशांत मिश्रा यांनी गुंतवणुकीचे विविध प्रकार, शेअर बाजारातील व्यवहार, म्युच्युअल फंड, डिमॅट खाते व्यवस्थापन तसेच सुरक्षित गुंतवणुकीचे मार्ग याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच आर्थिक नियोजन, बचत, महागाई आणि गुंतवणुकीतील जोखीम व्यवस्थापन या बाबींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. जी. एन. शिंदे यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम जीवन जगण्यासाठी आपल्या उपलब्ध संपत्तीचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य माहितीच्या आधारे केलेली गुंतवणूक भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाची ठरते, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात सुमारे 100 विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी गुंतवणुकीचे सुरक्षित मार्ग, फसवणुकीपासून बचाव आणि गुंतवणूक करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत विविध प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पुपलवड, डॉ. भोसले, डॉ. संतोष पाटील डॉ. आवाळे, डॉ. प्रवीणकुमार सेलूकर, डॉ. अजय गव्हाणे तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली उत्साहात

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला भारत सरकारची मान्यता;* *‘डेनिका लॅब टेक सोल्यूशन्स LLP’ची यशस्वी भरारी

Chief Editor

प्रा. ज्योत्स्ना गायकवाड वाघमारे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड राज्यशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी व्यासपीठ – कुलसचिव डॉ. डी. डी. पवार

Chief Editor

डॉ. महेश मगर यांच्या पाठपुराव्याला यश; आरआरसी प्रस्ताव सादरीकरणासाठी २० जूनपर्यंत मुदतवाढ

Chief Editor

जिल्हा परिषदेचा आरोग्यदूत उपक्रम स्तुत्य; विद्यार्थीच करतील गावांचा कायापालट -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chief Editor

Leave a Comment