एम सी आर
Uncategorized

डॉ. महेश मगर यांच्या पाठपुराव्याला यश; आरआरसी प्रस्ताव सादरीकरणासाठी २० जूनपर्यंत मुदतवाढ

नांदेड, दि. ३ जून : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधन व मान्यता समिती (आर.आर.सी.) बैठकीसाठी संशोधनासंदर्भातील विविध प्रस्ताव सादर करण्याची मुदत २० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतवाढीसाठी संशोधक विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापकांच्या वतीने डॉ. महेश मगर यांनी विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून विद्यापीठ प्रशासनाने मुदतवाढ जाहीर केली आहे.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार विविध विषयांच्या आरआरसी बैठका लवकरच आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी पीजी टीचर मान्यता, मार्गदर्शक मान्यता, संशोधन आराखडा, अंतिम शोध सारांश, विषय बदल, सहमार्गदर्शक नोंदणी रद्द करणे, मुदतवाढ आदी विविध प्रस्ताव पूर्वी ५ जून २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र संशोधक विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांना आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळावा, या मागणीसाठी डॉ. महेश मगर यांनी कुलगुरूंना निवेदन सादर केले होते. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २० जून २०२६ पर्यंत वाढविली आहे.

वाढीव मुदतीत प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव आगामी आरआरसी बैठकीत विचारार्थ ठेवण्यात येणार असून विद्याशाखानिहाय व विषयनिहाय बैठकींचे सविस्तर वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पदव्युत्तर विभागाने दिली आहे.

या निर्णयामुळे संशोधक विद्यार्थी, पीएच.डी. अभ्यासक आणि मार्गदर्शक प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळाला असून डॉ. महेश मगर यांच्या पाठपुराव्याबद्दल संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share

Related posts

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

सौ.अनिता रानवळकर यांना मराठी विषयात पीएचडी प्रदान

Chief Editor

शिक्षण क्षेत्राला सर्वस्व मानणारे: डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

स्वामी विवेकानंद संकुलात जागतिक महिला दिवस साजरा

Chief Editor

पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘विकास अध्ययन’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू

Chief Editor

Leave a Comment