साहित्यिक
मराठी भाषा गौरव दिन बालकवीच्या कवितांनी साजरा

गडचिरोली,प्रतिनिधी :-
झाडी बोली साहित्य मंडळ गडचिरोली आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कारवाफा यांचे संयुक्त विद्यमाने जि.प. उच्च प्राथमिक शाळा कारवाफा येथे मराठी भाषा गौरवदिन नुकताच साजरा करण्यात आला.
या प्रसंगी ‘शाळा माझी सुंदर ” या हस्तलिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटक जेष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांचे हस्ते करण्यात आले.
आपल्या उद्घाटकीय भाषणातून त्यांनी जि.प. कारवाफा शाळेचे शिक्षक जितेंद्र रायपुरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या बालकवींच्या संमेलनाचे कौतुक केले आणि अशा प्रकारचे उपक्रम शाळेत राबविल्यामुळे यातूनच कवी,लेखक निर्माण होतील असा आशावाद व्यक्त करतांनाच चांगले कवी लेखक बनण्यासाठी अवांतर वाचन,चितंन,मननाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी वैद्य मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांचे कौतुक करून भविष्यात ही कला जोपासावी असा मोलाचा सल्ला दिला.
याप्रसंगी पाहुणे म्हणून लाभलेले कवी उपेंद्र रोहणकर,पेंढारी आश्रमशाळेचे प्राचार्य बलगुजर सर, मुख्याध्यापिका पोरेटी मॅडम,तालुका फुलोरा अधिकारी मोरेश्वर अंबादे,विषय तज्ञ सोनुले सर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.
एकूण २७ बालकवींनी सहभाग नोंदवून त्यांनी आपल्या काव्यप्रतीभेने पाहुण्यांना थक्क केले.कवीसंमेलनात सादरीकरण केलेल्या बालकवींना झाडीबोली साहित्य मंडळातर्फे हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.