साहित्यिक

राजेंद्र गोणारकर यांच्या ‘नवी लिपी’ कवितासंग्रहाचे दुबईत प्रकाशन

नांदेड प्रतिनिधी: येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा लेखक- कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या ‘नवी लिपी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन दुबई करण्यात आले. जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळ नागपूर, मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर , दीपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने चौथे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन दुबई येथे नुकतेच संपन्न झाले. संमेलनाच्या उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवंत डॉ, रावसाहेब कसबे यांच्या हस्ते ‘नवी लिपी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी संमेलनाचे उद्घाटक अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस, प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, डॉ. एच. एम. मकवाना , डॉ. एन. सिंह , डॉ. दीपककुमार खोब्रागडे , डॉ. जगन कराडे, प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे,प्राचार्य डॉ.एस. डी. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
‘नवी लिपी’ संग्रहातील कविता ह्या नितांत सुंदर असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीचा आदरभाव व्यक्त करणाऱ्या ह्या कविता मौलिक आहेत, असे मत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. राजेंद्र गोणारकर यांचा हा दुसरा कवितासंग्रह असून या पूर्वी ‘अनारंभ’ (२००१) हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. याशिवाय त्यांची एकूण अकरा पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना पाच राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

_फोटो कॅप्शन – दुबई येथे कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या ‘नवी लिपी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करतांना सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस, डावीकडून प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे , डॉ. एन. सिंह , डॉ. दीपककुमार खोब्रागडे , डॉ. एच. एम. मकवाना, प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, डॉ. जगन कराडे,प्राचार्य डॉ.एस. डी. राठोड_

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.