गडचिरोली,प्रतिनिधी :-
झाडी बोली साहित्य मंडळ गडचिरोली द्वारे महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथे काव्य मैफिल घेण्यात आली.
या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष कवी डॉ.चंद्रकांत लेनगुरे होते.या वेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले कि, कामगार,शेतकरी यांच्या समस्या साहित्यातून प्रगट कराव्यात असे आवाहन उपस्थितांना करून त्यांनी ‘दीन महाराष्ट्र’ ही कविता याप्रसंगी सादर केली.
या उपस्थित असलेले कवी पुरुषोत्तम ठाकरे यांनी ‘माझी कविता’,कवी गजानन गेडाम यांनी ‘एकटाच बसतो मी’,कवी संजीव बोरकर यांनी ‘जुगार’ ही गझल, उपेन्द्र रोहणकर यांनी ‘महाराष्ट्र माझा’, कवयित्री प्रतिक्षा कोडापे यांनी ‘जय महाराष्ट्र माझा’,कवी कमलेश झाडे यांनी ‘चोर’ या रचना सादर केल्या.
याच बैठकीत मंडळाची मासिक सभा घेण्यात येऊन कवयित्री प्रतिक्षा कोडापे व कवी गजानन गेडाम यांची कार्यकारिणी वर सर्वानुमते सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यांचे निवडीबद्दल साहित्यिक बंडोपंत बोढेकर तसेच गडचिरोलीतील सुप्रसिद्ध कवी प्रा. विनायक धानोरकर, डॉ. प्रवीण किलनाके, जितेंद्र रायपुरे, मारोती आरेवार,प्रमोद राऊत आणि कवयित्री मालती सेमले, वर्षा पडघन, प्रेमिला अलोने इत्यादीनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे संचालन कमलेश झाडे यांनी तर आभार संजीव बोरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गीता लेनगुरे यांनी सहकार्य केले.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.