https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

देशात 1.87 लाख कोटी रुपयांचा जीएसटी, महाराष्ट्रात या महिन्यात 33,196 कोटी

दिल्ली,प्रतिनिधी :-

देशभरात आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी 1.87 लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल संकलित झालेला असून  महाराष्ट्रात या महिन्यात 33,196 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाला आहे.
एप्रिल 2023 मधील एकत्रित जीएसटी संकलन आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर, एप्रिल 2022 मधील 1,67,540 लाख कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनापेक्षा 19,495 कोटी रुपयांनी जास्त संकलन
लागोपाठच्या वर्षांतील जीएसटी महसुलाची तुलना करता एप्रिल 2023 मध्ये सरकारला 12%अधिक जीएसटी महसूल मिळाला आहे

20 एप्रिल 2023 रोजी करण्यात आलेल्या 9.8 लाख व्यवहारांच्या माध्यमातून दैनंदिन पातळीवरील सर्वात जास्त म्हणजे 68,228 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे.
एप्रिल 2023 मध्ये 1,87,035 कोटी रुपयांचे एकत्रित जीएसटी महसूल संकलन झाले आहे. यामध्ये CGST 38,440 कोटी रुपये, SGST 47,412 कोटी रुपये, IGST 89,158 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीमधून गोळा केलेल्या 34,972 कोटी रुपयांसह) आणि अधिभार 12,025 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीमधून गोळा केलेल्या 901 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्रात एकूण 33,196 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले आहे.

सरकारने IGST मधून नियमित थकबाकीपोटी  45,864 कोटी रुपयांच्या CGST ची आणि  37,959 कोटी रुपयांच्या SGST ची थकबाकी चुकती केली आहे. नियमित थकबाकी चुकती केल्यानंतर एप्रिल 2023 या महिन्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून CGST साठी 84,304 कोटी रुपये आणि SGST साठी 85,371 कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे.

एप्रिल 2023 महिन्यात जीएसटीपोटी गोळा झालेला महसूल,  मागील वर्षी याच महिन्यात संकलित जीएसटी महसुलापेक्षा 12% नी अधिक आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात (सेवांच्या आयातीसह) देशांतर्गत व्यवहारांद्वारे जमा झालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 16% नी जास्त आहे.

देशातील एकूण जीएसटी संकलनाने या महिन्यात प्रथमच 1.75 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मार्च 2023 मध्ये जारी करण्यात आलेल्या एकूण ई-वे बिलांची संख्या 9.0 कोटी  होती. ही आकडेवारी, फेब्रुवारी 2023 मध्ये जारी करण्यात आलेल्या 8.1 कोटी ई-वे बिलांपेक्षा 11% नी अधिक आहे.

एप्रिल 2023 मध्ये 20 तारखेला दैनंदिन पातळीवरील आतापर्यंतचे सर्वाधिक कर संकलन झाले. या दिवशी 9.8 लाख व्यवहारांच्या माध्यमातून, 68,228 कोटी रुपये कर संकलित करण्यात आला. गेल्या वर्षी याच तारखेला एका दिवसातील सर्वात जास्त कर संकलन झाले होते आणि तेव्हा 9.6 लाख व्यवहारांच्या माध्यमातून 57,846 कोटी रुपये संकलित करण्यात आले होते.

खालील तक्ता यंदाच्या वर्षातील एकूण मासिक जीएसटी महसूल संकलनाचे प्रकार दर्शवतो. या तक्त्यामध्ये एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये संकलित झालेल्या जीएसटीची राज्यनिहाय आकडेवारी दिली आहे.

एप्रिल 2023 दरम्यान जीएसटी महसुलात झालेली राज्यनिहाय वाढ

State/UT Apr-22 Apr-23 Growth (%)
Jammu and Kashmir 560 803 44
Himachal Pradesh 817 957 17
Punjab 1,994 2,316 16
Chandigarh 249 255 2
Uttarakhand 1,887 2,148 14
Haryana 8,197 10,035 22
Delhi 5,871 6,320 8
Rajasthan 4,547 4,785 5
Uttar Pradesh 8,534 10,320 21
Bihar 1,471 1,625 11
Sikkim 264 426 61
Arunachal Pradesh 196 238 21
Nagaland 68 88 29
Manipur 69 91 32
Mizoram 46 71 53
Tripura 107 133 25
Meghalaya 227 239 6
Assam 1,313 1,513 15
West Bengal 5,644 6,447 14
Jharkhand 3,100 3,701 19
Odisha 4,910 5,036 3
Chhattisgarh 2,977 3,508 18
Madhya Pradesh 3,339 4,267 28
Gujarat 11,264 11,721 4
Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 381 399 5
Maharashtra 27,495 33,196 21
Karnataka 11,820 14,593 23
Goa 470 620 32
Lakshadweep 3 3 -7
Kerala 2,689 3,010 12
Tamil Nadu 9,724 11,559 19
Puducherry 206 218 6
Andaman and Nicobar Islands 87 92 5
Telangana 4,955 5,622 13
Andhra Pradesh 4,067 4,329 6
Ladakh 47 68 43
Other Territory 216 220 2
Center Jurisdiction 167 187 12
Grand Total 1,29,978 1,51,162 16
Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704