आमदार सुरेशरावजी वरपूडकर यांच्या हस्ते कोल्हा ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र गायकवाड यांचा राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये जाहीर प्रवेश
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील कोल्हा ग्राम पंचायतीचे सरपंच रामचंद्र गायकवाड यांनी आमदार सुरेशरावजी वरपूडकर यांच्या मार्गदर्शनाखाले राष्ट्रीय काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव श्री. प्रदिपजी नारवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी जिल्हा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
या वेळी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष तथा पाथरी विधानसभेचे आमदार लोकप्रिय मा. ना. सुरेशरावजी वरपुडकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तुकारामजी रेंगे पाटील माजी आमदार सुरेशदादा देशमुख परभणी कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब रेंगे पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फुलारी काका, जिल्हा शहराध्यक्ष नदीम इमानदार, युवक काँग्रेसचे महासचिव अमोल जाधव, पाथरी विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव सचिन पौळ, मुंजाभाऊ भिसे, किशन भिसे, इब्राहिम शेख, दिगंबर तारे, मधुकर ढाकरगे, आत्मा राम इक्कर, गोविंद पौळ, सलीम शेख, बाळू साखरे, पांडू तारे, अमर माने, अमोल जाधव यांच्या सह काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते. मातब्बर पुढाऱ्याचे गाव म्हणून कोल्हा गावाकडे पाहिले जाते याच अनुषंगाने कोल्हा येथील ग्राम पंचायतीचे रामचंद्र गायकवाड यांनी राष्ट्रीय काँग्रेस मध्ये जाहिर प्रवेश केल्यामुळे प्रस्थापितांना एक धक्काच दिला असल्याचे बोलले जात आहे.
***