एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये जिल्हास्तरीय देशभक्तीपर एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन

नांदेड- (दिनांक 3 सप्टेंबर 2026)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत महाविद्यालयामध्ये दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय देशभक्तीपर एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मा.कुलगुरू साहेबांच्या आदेशानुसार 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त दिनांक 7 सप्टेंबर 2026 ते 23 सप्टेंबर 2026 या कालावधीत नांदेड, हिंगोली परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून हा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मराठवाडा मुक्ती दिनाचे महत्त्व रुजावे, मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव व्हावी आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक जाणीव आणि संगीत कलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 9 सप्टेंबर 2026 सकाळी ठीक 10:00 वाजता यशवंत महाविद्यालयाच्या संगीत विभागामध्ये ही देशभक्तीपर एकल गीत गायन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय सहभाग घेऊ शकतात. प्रत्येक महाविद्यालयातील दोन विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात.
ही स्पर्धा कराओके ट्रॅक किंवा तबला व हार्मोनियम यांच्या साथसंगती मध्ये संपन्न होईल. सहभागी विद्यार्थ्यांनी आपले वाद्य वादक सोबत घेऊन आले तरी चालतील किंवा आयोजक महाविद्यालयाने दिलेले वाद्यवादक साथीदारही त्यांच्यासाठी उपलब्ध राहतील.

या स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणारे विद्यार्थी विद्यापीठ स्तरावरील विभागीय स्पर्धेसाठी पात्र होतील. त्याचबरोबर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या एकल देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे व स्पर्धेचे समन्वयक तथा संगीत विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस व्ही शिंदे, प्रा.डॉ संगीता चाटी, प्रा. हरिदास उमाटे प्रा. उज्वलकौर रागी यांनी केले आहे या स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावे असे कळविण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालय / विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. एस व्ही शिंदे 09822986003, प्रा. डॉ. संगीता चाटी 09850790433 यांच्याशी संपर्क करावा.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये सुरेश धूत संचालित ध्यानधारणा उपक्रमाचे आयोजन

Chief Editor

बांधकाम कामगारांसाठी विविध योजना; सर्व सेवा पूर्णपणे मोफत* *अनधिकृत एजंटांकडून फसवणुकीपासून सावध राहा – प्रशासनाचे आवाहन

Chief Editor

सामाजिक माध्यमे आणि समाज’ पुस्तक प्रकाशित समाजशास्त्र विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ग्रंथ

Chief Editor

शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन — डॉ. शेखर घुंगरवार

Chief Editor

हनुमान पेठ, नांदेड-भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक सुमित मुथा यांची निवड.

Chief Editor

यशवंत वार्षिक युवक महोत्सव अंतर्गत पेपर सादरीकरण स्पर्धा संपन्न

Chief Editor

Leave a Comment