ताज्या घडामोडी

निष्ठावंत कार्यकर्ता- कै. रामचंद्र धोंडीबा उमरीकर

रामचंद्र धोंडीबा उमरीकर यांचा जन्म उमरी या गावी एका गरीब घराण्यात झाला. त्यांचे वडील हे धोंडीबा उमरीकर हे लहान असतानाच वारले त्यामुळे त्यांच्या आईने काबाडकष्ट करून लहानाची मोठे केले त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांचे शिक्षण फक्त इयत्ता चौथी पर्यंत झाले रामचंद्र उमरीकर हे जातीने वासुदेव होते. ते दररोज सकाळी हातात टाळ व डोक्यावर मोरपिसाची टोपी घालून भिक्षा मागायचे.
सन 1955 साली ते नांदेडला आले त्यांना सामाजिक चळवळीत काम करण्याची तळमळ असल्यामुळे व ते देशभक्त असल्यामुळे त्यांनी शामरावजी बोधनकर, साहेबरावजी बारडकर, भगवानराव गांजवे, बन्सीलालजी व्यास, आबासाहेब देशमुख लहानकर, वासुदेवराव भुसारे, नारायणराव परांजपे, अनंतरावजी टेळकीकर, कंधारचे माजी आमदार ऍड .गोविंदरावजी मोरे यांच्यासह नामवंत अशा स्वातंत्र्यसैनिक सोबत भूमिगत राहून हाल अपेष्टा सहन करून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला देशभक्तीचे कार्यकर्त्यांनी परिस्थितीचा सामना करीत घराकडेही लक्ष दिले.
माजी आमदार कै.बाबासाहेब गोरठेकर, शंकररावजी चव्हाण यांच्या संपर्कात राहून काँग्रेस सोबत नाते जोडले त्या काळात काँग्रेसची पकड नव्हती त्यावेळी त्यांनी आपले सहकारी कै.बाजीराव शिंदे, सूर्यकांताताई पाटील , श्रीराम पाटील राजूरकर, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, ऍड गोविंदराव बाराळीकर हेमराजजी मुथा, खंडेराव वाघीकर, विठ्ठलराव कांबळे, ए पी इंगोले, घोणसे पाटील, आदी सहकार्यासोबत राहून नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे पकड मजबूत केली आणीबाणी संपल्यावर दरम्यानच्या च्या रामचंद्र उमरीकर यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून काम केले त्यांनी आपल्या काळात भटक्या विमुक्त संघटनेची स्थापना केली त्यांच्या समवेत मुखेडचे माजी आमदार किशनराव राठोड, माजी आमदार गोविंदराव राठोड, रामभारती पिंपरखेडकर,l यांनी सुद्धा पुढाकार घेतला व त्यांना सहकार्य केले उमरीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबत सुद्धा काँग्रेस पक्षाचे कार्य केले हे एक निष्ठावंत सच्चे कार्यकर्ते होते एवढे कार्य करूनही त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही ते शेवटपर्यंत काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनच कार्य केले उमरीकर एक स्वतंत्र सैनिक, सामाजिक कार्यकर्ता, राजकारणी, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात यशस्वीरित्या काम केले तसेच त्यांनी वासुदेव समाज एकत्रित करण्यासाठी मुखेड मध्ये पंढरीनाथ घोगरे संभाजी पाटील आदी प्रतिष्ठित समाज बांधवा सोबत सुरवात केली पण वासुदेव बांधवांनी प्रतिसाद दिला नाही.
त्यांनी काही काळ दैनिक पंचनामाचे संपादक लक्ष्मणराव गायकवाड यांच्या समवेत पत्रकारिता केली तसेच त्यांचा मुलगा जगदीश उमरीकर हा सुद्धा वासुदेव समाज सेवा संघ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि तो सुद्धा पत्रकारिता, विविध संघटनेचे पदाधिकारी म्हणून सुद्धा काम करीत आहेत.
रामचंद्र उमरीकर यांचे 3 सप्टेंबर 2008 रोजी गणेश चतुर्थी या दिवशी निधन झाले अशा सच्चा निष्ठावंत कार्यकर्ताचा मरणोत्तर स्वतंत्रसैनिक म्हणून तरी शासनाने सन्मान करावा त्यांना हीच खरी श्रद्धांजली राहील…!!
हरेश बाबूभाई ठक्कर
पत्रकार नांदेड

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.