ताज्या घडामोडी
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याने सकल मराठा समाजाने गूलाल उधळून केला आनंदोत्सव साजरा.

*
MCR NEWS / MANAWA
ANIL CHAVAN
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आझाद मैदानावरील उपोषणाला यश मराठा बांधवांनी गुलाल उधळत बँड वाजून जल्लोष केला.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण आपल्या मराठा बांधवा सहित सुरू केले होते. उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांचे मागण्या मान्य झाल्याने आमरण उपोषणाची सांगता शासन नियुक्त उपसमितीच्या चर्चेत बहुतांश मागण्या मान्य झाल्याने आज मानवत तालूक्यासह मानवत शहरातील सकल मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळत बँड वाजवीत जल्लोष साजरा केला.
एक मराठा लाख मराठा अशा जोरदार जय घोषणा करत आपल्या विजयाच्या
फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी शेकडो सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते