https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिलाफलकाचे अनावरण

मानवत पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक श्री. दिपक दंतुलवार यांच्या हस्ते अनावरण

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. ताडबोरगाव येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त “मेरी मिट्टी मेरा देश” अभियानांतर्गत व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शहीद जवानाच्या स्मरनार्थ शिलाफल काचे अनावरण मानवत पोलीस स्टेशनंचे कर्तव्य दक्ष निरीक्षक श्री. दिपक दंतुलवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अ‍ॅड. गणेशराव मोरे पाटील यांची उपस्थिती होती. सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर या शिलाफलकाचे अनावरण सोहळा पार पडला यावेळी मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांचे समस्त ताडबोरगाव गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्काऊट गाईडच्या संचलनाने शिला फलकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी श्री. दिपक दंतुलवार पुढे बोलताना म्हणाले देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी त्याग बलिदान दिले त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करून त्यांची प्रेरणा आपण सर्वांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी देशाचा अभिमान बाळगून बंधुतेच्या भावनेने सर्वांनी वागले पाहिजे, ही भूमिका प्रत्येक माणसाची व्हावी असा आशावाद व्यक्त करून त्यांनी समारोप केला यावेळी कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते तर शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल सावळे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रमात सर्वांचे आभार मानले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704