एक पेड मां के नाम’ अंतर्गत ‘यशवंत’ मध्ये वृक्षारोपण
नांदेड:(दि.२३ ऑगस्ट २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार आणि माजी प्र- कुलगुरु तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘एक पेड मां के नाम’ मोहिमेंतर्गत एक दिवसीय वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विविध प्रजातींच्या झाडांची आंबा, जांभूळ, शिशु, करवंद, आकालीन, गोधमी आणि बांबूच्या झाडांचे महाविद्यालयीन परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
एक दिवसीय वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलास इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा.राजश्री भोपाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.कांचन गायकवाड, प्रा.श्रीराम हुलसुरे आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ. हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.