नांदेड :प्रतिनिधी
यशवंत महाविद्यालय नांदेड येथील समाजशास्त्र विभागाच्या वतीने पदवी व पदव्युत्तर समाजशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वप्रथम भारतीय समाज शास्त्रज्ञ डी पी मुखर्जीचे समाजशास्त्रातील योगदान या भिंती पत्रिकेचे अनावरण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे अमरावती विद्यापीठाचे समाजशास्त्र मंडळाचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर बी एच. किर्दक सर यांच्या हस्ते करण्यात आले.
भिंती पत्रिकेच्या अनावरण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. शिंदे सर, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. एम. कांबळे सर, डॉ.बी. आर. भोसले सर, प्रा. शंकर मरकड सर, डॉ. शिवशंकर रत्नपारखे प्रा. पूजा मिरगेवार मॅडम, प्रा. ज्योती भगत मॅडम, तसेच समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. भिंती पत्रिकेच्या अनावरणानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करून नवनिर्वाचित
यानंतर कार्यक्रमाला प्रमुख
अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव व सर्व सभासदांचे स्वागत करण्यात आले महाविद्यालयाच्या प्राचार्यानी अभ्यास मंडळाच्या निर्मितीचा उद्देश व महत्व सांगून मंडळाचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. तसेच समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बी. एम. कांबळे सर यांनी अभ्यास मंडळाच्या निर्मितीत विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले. तसेच प्रा. डॉ. बी. आर. भोसले सरांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व या शैक्षणिक वर्षात समाजशास्त्र विभागाची यशस्वी वाटचाल कशी चालू आहे यावर प्रकाश टाकला. पाहुणे म्हणून उपस्थित असणारे अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. बी. एच. किरदिक सर यांनी समाजशास्त्र हा विषय सध्याच्या परिस्थितीत अभ्यासणे का? गरजेचा आहे हे सांगून समाजात निर्माण होणारे अनेक प्रश्न अथवा समस्यांची निर्मूलन करण्यासाठी या विषयाची उपयुक्तता असल्याचे सांगितले. अलीकडच्या काळात विद्यार्थी हा एकलकोंडा होत असल्याने कुटुंब, समाज, महाविद्यालय, त्याचा या ठिकाणी संवाद कमी झाल्याने विद्यार्थी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसून येतो. विद्यार्थी, समाजातील व्यक्ती, यांना येणारे नैराश्य, न्यूनगंड कमीपणाची भावना, दूर करून त्यांच्या नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न या विषयाच्या माध्यमातून होतो असे त्यांनी प्रतिपादन केले आजच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता व अपयशाने खचून न जाता जीवनामध्ये समतोल साधण्याचे मानसिक बळ समाजशास्त्र विषयाद्वारे मिळते. त्याचबरोबर आजच्या समाजात अनेक समस्या आव्हान म्हणून पुढे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने दारिद्रय, बेकारी, गरिबी, गुन्हेगारी, वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून समाज अस्थिर होतो. या सर्व समस्यावर मात करायची असेल तर समाजशास्त्राबरोबर नीतीशास्त्र, धर्मशास्त्र, यांनाच आदर्श प्रमाण मानून जीवन जगले पाहिजे. समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना या विषयांमध्ये अनेक संधी उपलब्ध असल्याचे देखील त्यांनी सांगितले ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समुपदेशक, संशोधक, समाजसेवक, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना महिला व बालविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, निम शासकीय संस्था, समाज कल्याण अधिकारी अशा अनेक महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते असे त्यांनी सांगितले. समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शंकर मारकड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. शिवशंकर रत्नपारखे यांनी मानले. या कार्यक्रमाला समाजशास्त्र विभागातील विभाग प्रमुख डॉ. बी. एम. कांबळे प्रा.डॉ. बी. आर. भोसले प्रा. शंकर मारकड प्रा. डॉ. शिवशंकर रत्नपारखे, प्रा. पूजा मिरगेवार मॅडम, प्रा. ज्योती भगत मॅडम, तसेच महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
