अपघात
गडचिरोलीतील अपघातांची उच्च न्यायालयाकडून दखल; जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

उदय धकाते
गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील महामार्गावर अपघात का होतात अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालय,खंडपीठ नागपूर ने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर आणि महेंद्र चांदवानी नोटीस बजावून केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वात आले आहेत. तसेच या महामार्गावर अनेक मोठे अपघात होत आहेत. यात अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. अनेक नागरिक हे अद्यापही जखमी अस्वस्थेत आहेत हे विशेष.
दक्षिण गडचिरोलीतील आलापल्ली ते आष्टी दरम्यान सातत्याने अपघात का होतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. यावर २१ जूनपर्यंत केंद्र, राज्य शासन आणि गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. हि जनहित याचिका नितीश पोद्दार यांनी दाखल केली आहे.
जिल्हा प्रशासन झोपेत
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शहरात सह शाळा-महाविद्यालय व रुग्णालयाने वसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील लहान गावांसाठी ही वाहतूक जीवघेणी ठरत आहे. गेल्यावर्षी या मार्गावरील अपघाताच्या प्रकरणांमध्ये ४७ गुन्हे नोंदविण्यात आले असल्याचे या जनहित याचिकेत दावा केला आहे. वाहतूक सुरक्षा, महामार्गांची देखभाल आणि पर्यावरणाच्या मुद्यावरून खाण व्यवस्थापनासह पोलीस विभाग आणि स्थानिक अधिकाऱ्यांना स्थानिक ग्राम पंचायतींनी निवेदनाद्वारे विनंती अनेकदा केली आहे. मात्र, कुठलीही कारवाई करण्यात न आल्याने यावर केंद्र व राज्य शासनाने पाऊले उचलण्याची गरज असल्याने हि याचिका दाखल करण्यात आली आहे.