एम सी आर
Uncategorized

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात छायाचित्रकार विजय होकर्णे निर्मित* *‘गोदाकाठचा महान कर्मयोगी’ माहितीपटाचे प्रदर्शन*

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात छायाचित्रकार विजय होकर्णे निर्मित
‘गोदाकाठचा महान कर्मयोगी’ माहितीपटाचे प्रदर्शन

नांदेड प्रतिनिधी:

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भारताचे माजी गृहमंत्री, मराठवाड्याचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्रात जलक्रांती घडवून कृषी विकासाला नवी दिशा देणारे डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त छायाचित्रकार विजय होकर्णे निर्मित ‘गोदाकाठचा महान कर्मयोगी’ या माहितीपटाचे प्रदर्शन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये दि: १४ जुलै, २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, ‘मराठवाडा : आज, काल आणि उद्या’ या विषयावरील व्याख्यानासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा व्यवस्थापण परिषदेचे सदस्य नरेंद्र चव्हाण, डॉ प्रशांत पेशकार, नारायण चौधरी जनसंपर्क अधिकारी अशोक कदम, डॉ. दिलीप चव्हाण तसेच विद्यापीठातील विभागप्रमुख, अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, जलसिंचन क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानाचा, कृषी विकासासाठी केलेल्या कार्याचा आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासातील त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेचा प्रभावी वेध या माहितीपटातून घेण्यात आला. छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी अनेक वर्षांच्या अभ्यासपूर्ण संशोधनातून आणि अथक परिश्रमातून साकारलेल्या या माहितीपटाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत कौतुक केले.
प्रदर्शनानंतर विजय होकर्णे यांनी माहितीपटाच्या निर्मितीमागील प्रेरणा, संशोधन प्रक्रिया आणि डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचे दस्तऐवजीकरण करताना आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि ज्येष्ठ व्याख्याते माधव भंडारी यांच्या हस्ते छायाचित्रकार विजय होकर्णे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी या माहितीपटाला डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रेरणादायी कार्याला उजाळा देणारा आणि भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारा ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचे गौरवोद्गार काढले.
———————–

Share

Related posts

यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Chief Editor

कै सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे दिनांक 9 ते 12 मार्च 2026 दरम्यान “कमलोत्सव 2026

Chief Editor

शिक्षणावर खर्च न केल्यास तुरुंगावर करावा लागेल -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

जिल्हा परिषदेचा आरोग्यदूत उपक्रम स्तुत्य; विद्यार्थीच करतील गावांचा कायापालट -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

Chief Editor

Leave a Comment