एम सी आर
Uncategorized

नांदेडमध्ये भरदिवसा खून; इंदिरानगर परिसरात खळबळ

नांदेड, दि. 26 (प्रतिनिधी) – शहरातील वाडी परिसरातील इंदिरानगर येथे काल भरदिवसा एका इसमाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत व्यक्तीचे नाव प्रताप गायकवाड (वय अंदाजे 35) असे असून ते व्यवसायाने मिस्त्री होते. प्राथमिक माहितीनुसार, काही व्यक्तींशी त्यांचा किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटल्यासारखा वाटत असतानाच आरोपींनी गायकवाड यांचा पाठलाग करून त्यांना अडवले आणि धारदार शस्त्राने वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Share

Related posts

माय मराठीचा समृद्ध वारसा जपण्यासाठी ज्ञानवन प्री स्कूलची स्थापना

Chief Editor

मराठवाड्यात विकासाची मोठी सुप्तशक्ती” – ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी

Chief Editor

नियमांच्या चौकटीत माणुसकी जपणारा अधिकारी शेख सिकंदर अली

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात करियर कट्टा इंडक्शन अवेअरनेस प्रोग्राम संपन्न 9

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘प्रगत आण्विक जीवशास्त्र’ प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

Chief Editor

मानवत येथील डॉ. राशी लड्डा हिचा नवा विश्वविक्रम

Chief Editor

Leave a Comment