एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठात अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नांदेड:

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकस्मात दुःखद निधनाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आज विद्यापीठाच्या वतीने दि.२९ जानेवारी रोजी मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.
या श्रद्धांजली सभेला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेदरम्यान सर्व उपस्थितांनी दिवंगत नेत्यास दोन मिनिटांचे मौन राखून आदरांजली अर्पण केली. विद्यापीठाच्या वतीने उज्ज्वल पद्धतीने त्यांच्या सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय कार्याचा तथा महाराष्ट्र व देशासाठी केलेल्या योगदानाचा भावपूर्ण स्मरण केला गेला. सभा शांत व शोकमय वातावरणात पार पडली.
————————————

Share

Related posts

*ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला ) वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी

Chief Editor

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने विद्यापीठात ‘पीएच.डी. एंड-टू-एंड’ सॉफ्टवेअर पोर्टलचा शुभारंभ

Chief Editor

संपलाही नाही संपणार नाही माझ्या भिमाचा दरारा* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते डॉ. शिवराज शिंदे यांच्या भीम गीताचे विमोचन

Chief Editor

कै सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे दिनांक 9 ते 12 मार्च 2026 दरम्यान “कमलोत्सव 2026

Chief Editor

तहसिलदार* पांडूरंग माचेवाड यांच्या हस्ते सोमवारी तहसिल प्रांगणात शासकीय ध्वजारोहन

Chief Editor

नांदेडमध्ये सुखबीरसिंग बादल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला; हल्लेखोर ताब्यात

Chief Editor

Leave a Comment