एम सी आर
Uncategorized

नशामुक्त युवा – विकसित भारत’ जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड, दि. 3 ऑगस्ट : भारत सरकारच्या मेरा युवा भारत नांदेड यांच्या वतीने ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे 1 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी यशवंत महाविद्यालय हे स्थळ भागीदार म्हणून सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभाने स्पर्धांची सुरुवात झाली. या स्पर्धांमध्ये १८० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

स्पर्धांचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार डी. पी. सावंत उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड तर सह-प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे उपस्थित होते.

या स्पर्धांमध्ये स्लॅम पोएट्री, वक्तृत्व/वादविवाद, घोषवाक्य लेखन, नृत्य स्पर्धा, संगीत व रॅप स्पर्धा, रिल/लघुपट निर्मिती, नुक्कड नाटक/माइम सादरीकरण तसेच चित्रकला स्पर्धा अशा एकूण आठ विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

उद्घाटन समारंभात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती हा केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचा विषय असल्याचे सांगितले. स्वतःच्या सातत्यपूर्ण आत्मविकासातूनच सक्षम युवक आणि विकसित भारताची निर्मिती होऊ शकते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर आधारित मौलिक चित्रकला, प्रभावी नृत्य सादरीकरणे, संगीत, रॅप तसेच नुक्कड नाटके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक स्पर्धेत सामाजिक संदेश आणि सर्जनशीलतेचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळाला.

या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक जिल्हा युवा अधिकारी अशनी अनिल कनकटे यांनी नेतृत्व केले. कार्यक्रम अधिकारी, NSS डॉ. बिंडगे, डॉ. सूर्यवंशी आणि डॉ. रत्नमाला म्हस्के यांनी सह-आयोजक म्हणून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.

समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यात विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांनी आणि संघांनी आपल्या यशाचा आनंद साजरा करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
00000

Share

Related posts

नांदेड महापौर चषक स्पर्धांचे आयोजन व क्रीडा शिष्यवृत्ती योजनेसाठी महापौरांना निवेदन

Chief Editor

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

Chief Editor

स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील क्रीडा महोत्सव-2026 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

Chief Editor

हिंदी भाषेची जागतिक पटलावर सशक्त उपस्थिती* -डॉ. बसवेश्वर बेंद्र

Chief Editor

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चार चिमुकल्यांचा बळी; कुटुंबीयांना २० लाख मदत द्या — डॉ. मुजाहिद खान

Chief Editor

Leave a Comment