एम सी आर

यशवंत ‘ मधील एनसीसी कॅडेट्सची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

Uncategorized

नांदेड:( दि.१७ जानेवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स जे.यु.ओ. शंकर वहिंदे व अभिनव कदम यांची तामिळनाडू येथे दि.१९ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान संपन्न होणाऱ्या ‘ एक भारत श्रेष्ठ भारत’ या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी दोन्ही कॅडेटसचा यथोचित सत्कार केला आणि राष्ट्रीय शिबिरासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या दोन्ही कॅडेट्सना ५२ महाराष्ट्र बटालियनच्या वतीने सगरोळी येथील एनसीसी थर्ड ऑफिसर मंगेश कुलकर्णी सहकार्य करणार आहेत. संपूर्ण देशभरातून सहभागी होणाऱ्या कॅडेट्सना राष्ट्रीय एकात्मता, कल्चर एक्सचेंज प्रोग्रॅम इ. संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या निवडीबद्दल उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ. एल व्ही पदमाराणी राव, डॉ.साहेब शिंदे, प्रा. माधव दुधाटे, लेफ्टनंट डॉ.रामराज गावंडे, राष्ट्रीय छात्र सेनेचे संचालक लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर, डॉ.अजय गव्हाणे, प्रा. ओमप्रकाश गुंजकर, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

Related posts

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये २ ऑगस्टला भव्य शोभायात्रा विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण सत्कार सोहळा

Chief Editor

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रशासन सतर्क नांदेड जिल्ह्यात जीवित व वित्तहानी नाही नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री अतुल सावे

Chief Editor

व्यवस्था बदलल्याशिवाय स्त्रीमुक्ती अशक्य – कॉ. किरण मोघे

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

सामाजिक चळवळी जातीवर नव्हे महापुरुषांच्या विचारावर मोठया होतात.: सचिन साठे

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो (मुले) स्पर्धेचे थाटात उदघाटन

Chief Editor

Leave a Comment