एम सी आर

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो (मुले) स्पर्धेचे थाटात उदघाटन

Uncategorized

नांदेड,:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो (मुले) स्पर्धेचे उद्घाटन दि .२ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी क्रीडा मैदानावर पार पडले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हे उद्घाटन क्रीडा मशाली द्वारे ज्योत पेटवून आणि रंगबिरंगी फुगे हवेत सोडून पार पडले. यावेळी त्यांच्या समवेत भारतीय खो-खो संघाची कर्णधार प्रतीक वाईकर, आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू हर्षल हातानकर, ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचे निरीक्षक डॉ.जगदीश गस्ती, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.प्रशांत पेशकार, डॉ.सूर्यकांत जोगदंड, डॉ.सुरेखा भोसले, कुलसचिव डॉ.ज्ञानेश्वर पवार, क्रीडा संचालक डॉ.भास्कर माने, अधिसभा सदस्य डॉ.महेश बेंबडे, रासेयो संचालक डॉ मारुती गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. दिनांक २ ते ६ एप्रिल २०२६ या दरम्यान चालणाऱ्या या खो-खो स्पर्धेसाठी पाच राज्यातून जवळपास ७४ टीमने सहभाग नोंदवला आहे.

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थान असे पाच राज्यातील एकूण ७४ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी एकूण ४ क्रीडांगण तयार करण्यात आले आहेत. स्पर्धा ह्या दिवस व प्रकाश झोतात खेळले जाणार आहेत. या स्पर्धा सकाळी ७ ते ११ आणि संद्याकाळी ७ ते ११ दरम्यान खेळवल्या जाणार आहेत. स्पर्धेसाठी विविध समित्या तयार करण्यात आले आहेत.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा समन्वयक डॉ पवन पाटील, डॉ महेश वाकडकर, डॉ मीनानाथ गोमसाळ, डॉ दिलीप माने , डॉ माधव कदम, डॉ बालाजी जाधव, डॉ अनिल इंगोले, डॉ भीम केंगले, डॉ शिवानंद पाटील, डॉ अभिजीत सरनाईक, डॉ अशोक चाटसे, डॉ तातेराव केंद्रे, डॉ गणेश मांगिरे, यांच्यासह विद्यापीठातील कर्मचारी संजयसिंह ठाकुर, शिवाजीराव हंबर्डे, रामा किरकन, सुनील लुटे, रतनसिंघ पुजारी, परमजीतसिंघ सिंधू, प्रकाश इबितवार ई. परिश्रम घेत आहेत.

*पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो (मुले) स्पर्धेला नांदेडमध्ये रंगत*

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो (मुले) स्पर्धा उत्साहात पार पडत असून विविध राज्यांतील विद्यापीठांच्या संघांनी दमदार कामगिरी करत सामने गाजवले.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात राजा शंकर शहा विद्यापीठ, छिंदवाडा संघाने राणी अवंतीबाई विद्यापीठ, सागर संघावर एक डाव व ५ गुणांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात श्री गोविंद गुरु विद्यापीठाने श्री कुशलदास विद्यापीठ, हनुमानगड संघावर मात केली.
तिसऱ्या सामन्यात जय नारायण व्यास विद्यापीठ, जोधपूर विरुद्ध पंडित दीनदयाल उपाध्याय शेखावाटी विद्यापीठ यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत शेखावाटी विद्यापीठाने अवघ्या १ गुणाने विजय मिळवला. चौथ्या सामन्यात राजऋषी भर्तृहरी मत्स्य विद्यापीठ, अलवर संघाने कोटा विद्यापीठावर १ गुण व ८.१० मिनिटे राखून विजय संपादन केला.
पाचव्या सामन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संघाने डॉ. डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल विद्यापीठ, कोल्हापूर संघावर एक डाव व २५ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. सहाव्या सामन्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक संघाने कडी सर्व विद्यापीठ, गांधीनगरवर एक डाव व १३ गुणांनी विजय नोंदवला.
सातव्या सामन्यात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघाने भीमा चंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठावर विजय मिळवला. आठव्या सामन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर संघाने राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर संघावर एक डाव व १२ गुणांनी विजय संपादन केला.
या स्पर्धेत पंचप्रमुख म्हणून प्रशांत पाटणकर यांनी काम पाहिले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक संदीप तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष सावंत, प्रभाकर काळे, दीपक सपकाळ, रणजीत जाधव, अंकुश चव्हाण, सचिन तहानिक, अमोल मुरकुळे व सुजित माळी यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेमुळे नांदेडमध्ये क्रीडाप्रेमींचा उत्साह वाढला असून पुढील सामने अधिक चुरशीचे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share

Related posts

कोण होते डॉ. नरेंद्र दाभोलकर?, कोण होते कॉ. गोविंद पानसरे?, कोण होते एम. एम. कलबुर्गी? व कोण होत्या गौरी लंकेश? या पुस्तिकांचे लोकार्पण

Chief Editor

विद्यार्थ्यांच्या समस्यांवर कुलगुरूंचा थेट संवादातून सकारात्मक प्रतिसाद

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

Chief Editor

बालकलाकारांच्या अदाकारीने रंगले स्नेहसंमेलन

Chief Editor

विद्यार्थ्यांनी आयुष्याच्या परीक्षेमध्ये पास व्हावे- तानाजी भोसले

Chief Editor

सुदृढ शरीर व आनंदी जीवनासाठी दररोज व्यायाम आवश्यक : मनीषा जायभाये”

Chief Editor

Leave a Comment