एम सी आर

स्वारातीम विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

Uncategorized

नांदेड:

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षामध्ये आज शुक्रवार, दि.२३ जानेवारी, २०२६ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, ज्ञानस्तोत्र केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. सुहास पाठक, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, सुनील जाधव, शिवाजी चांदणे व नारायण गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत उपस्थित प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली.
————————–

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये सेवानिवृत्त हिंदी विभागप्रमुख डॉ.अनीता दिगंबरसिंह रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

आरआरसी प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढविण्याची: डॉ. महेश मगर यांची मागणी

Chief Editor

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांनी केली -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

यशवंत ‘ मधील प्रा.माधव दुधाटे यांना पीएच.डी. प्राप्त

Chief Editor

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून विनाशुल्क परीक्षा फॉर्म भरून घेण्याची मागणी: डॉ महेश मगर

Chief Editor

यशवंत ‘ मधील श्रेयस चव्हाण यांची भारतीय नौसेनेमध्ये निवड

Chief Editor

Leave a Comment