एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये सेवानिवृत्त हिंदी विभागप्रमुख डॉ.अनीता दिगंबरसिंह रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नांदेड:(दि.२३ फेब्रुवारी २०२६)
यशवंत महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. अनीता दिगंबर सिंह रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, हिंदी विभागप्रमुख डॉ. संदीप पाईकराव, डॉ.साईनाथ शाहू आणि विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच पीपल्स कॉलेजमधील डॉ.मुकुंद कवडे यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
डॉ. रावत यांनी आपल्या दीर्घ आणि समर्पित सेवाकाळात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनवृत्ती आणि साहित्यिक जाणीव यांना सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची प्रतिभा विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. त्या केवळ अभ्यासक्रमापुरत्या मर्यादित अध्यापिका नव्हत्या, तर विद्यार्थ्यांमध्ये भाषा, साहित्य आणि जीवनमूल्यांची सखोल जाण निर्माण करणाऱ्या प्रेरणादायी गुरु होत्या.
संशोधक मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक जीवनाला दिशा दिली. संशोधक विद्यार्थ्यांसाठी त्या एक सक्षम आधारस्तंभ होत्या. त्यांच्या जिज्ञासांचे संयमाने निरसन करत त्या विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यास प्रेरित करत. त्यांचा स्नेहशील स्वभाव विद्यार्थ्यांना मातृत्वाची ऊब देणारा होता. त्या शिस्तप्रिय होत्या; मात्र त्यांची शिस्त कठोरतेवर नव्हे तर आत्मीयता, नैतिकता आणि मूल्यांवर आधारित होती.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये समाजशास्त्र सत्रारंभ सोहळा संपन्न

Chief Editor

महादेव पिंपळगाव येथे अति आवश्यक संच वितरण कॅम्पमध्ये गोंधळ; बांधकाम कामगारांची गैरसोय

Chief Editor

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 22 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

Chief Editor

चढया दराने खताची विक्री केल्याने* *देगलूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Chief Editor

घरफोडी प्रकरणातील आरोपी १२ तासांत जेरबंद; १९.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील क्रीडा महोत्सव-2026 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

Leave a Comment