एम सी आर
Uncategorized

प्लॉस्टीकमुक्त कॅम्पस करण्याची शपथ व प्लॉस्टीकची होळी

परभणी : होळीच्या निमित्ताने येथील कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात प्लास्टिकमुक्त कॅम्पससाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता करून जमा झालेल्या प्लास्टिक कचऱ्याची प्रतीकात्मक होळी करण्यात आली तसेच महाविद्यालय परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्याची शपथ विद्यार्थीनी व प्राध्यापकांनी घेतली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थीनींनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून प्लास्टिक कचरा वेचला व तो एकत्रित करून त्याची होळी करण्यात आली. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.

या स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयातील विद्यार्थीनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनीही श्रमदान करून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. सर्वांनी मिळून महाविद्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचा व प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प केला.

या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थीनींमध्ये जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Share

Related posts

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

Chief Editor

यशवंत ‘ मधील रामेश्वर जाधव यांना अर्थशास्त्रात पीएच.डी. प्रदान

Chief Editor

रियाद सेनन यांना डॉ. किशोर इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली संख्याशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय खगोलभौतिकी परिषद

Chief Editor

आम्ही वारकरी परिवाराकडून संपूर्ण महाराष्ट्रात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन..

Chief Editor

बदलीनंतरही जपलेले प्रेम अन् सन्मान; माजी शिक्षक गुलाबराव मदने यांचा भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळेत भावनिक सत्कार

Chief Editor

Leave a Comment