एम सी आर
Uncategorized

मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा -डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड

मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा*
-डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड 
(यशवंत महाविद्यालय अभ्यासकेंद्रात उद्बोधन कार्यक्रम)
नांदेड :(दि. ७ सप्टेंबर २०२६)
शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला परिस्थितीची अडचण न येता शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात मुक्त विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा तसेच उपलब्ध शैक्षणिक सेवांचा लाभ घेऊन आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीला दिशा द्यावी, असे प्रतिपादन अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत यशवंत महाविद्यालय, नांदेड अभ्यासकेंद्राच्या वतीने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि.६ सप्टेंबर रोजी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पुपलवाड बोलत होते.
यावेळी त्यांनी मुक्त विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा व सेवा, अभ्यासपद्धती तसेच विद्यापीठाचे वेगळेपण याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. मुक्त शिक्षण पद्धतीमुळे नोकरी, व्यवसाय किंवा अन्य जबाबदाऱ्या सांभाळतानाही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून शिक्षण पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्यासकेंद्राचे केंद्र संयोजक डॉ. शिवराज बोकडे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी, विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहून नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि विद्यापीठाच्या विविध सेवांचा योग्य उपयोग करावा, असे आवाहन केले. मुक्त विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध संधी उपलब्ध करून देत असून त्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास डॉ. प्रवीणकुमार सेलुकर व प्रा. शरद वाघमारे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन डॉ. संतोष पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र सहाय्यक भुजंग पुयड व प्रभू पाटील यांनी परिश्रम घेतले तसेच डॉ. अजय गव्हाणे, संदीप पाटील, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share

Related posts

सब-ज्युनिअर राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नांदेडच्या खेळाडूंची दमदार कामगिरी महाराष्ट्र संघाचा ओव्हरऑल चॅम्पियनशिपवर कब्जा

Chief Editor

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाचे आयोजन

Chief Editor

यशवंत ‘ भारत एन्व्हॉर्मेंट प्रोग्रामद्वारे राष्ट्रस्तरीय प्लॅटिनम गोल्ड पारितोषिकाने सन्मानित

Chief Editor

हिंद दी चादर’ या भव्य समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी दोन दिवस उल्लेखनीय सेवाकार्य केले.

Chief Editor

मौजे दरेगाव येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी…

Chief Editor

विज्ञान आणि आरोग्य यांच्या समन्वयामुळे समाज सुदृढ बनू शकतो – डॉ. नितीन जोशी यांचे प्रतिपादन

Chief Editor

Leave a Comment