एम सी आर
Uncategorized

संपलाही नाही संपणार नाही माझ्या भिमाचा दरारा* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते डॉ. शिवराज शिंदे यांच्या भीम गीताचे विमोचन

संपलाही नाही संपणार नाही माझ्या भिमाचा दरारा*
*कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते डॉ. शिवराज शिंदे यांच्या भीम गीताचे विमोचन*

नांदेड:
“संपलाही नाही, संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा” या ओळींनी भारलेले प्रेरणादायी भीमगीत नुकतेच नांदेड येथे मोठ्या उत्साहात प्रकाशित करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डॉ. शिवराज शिंदे यांनी गायलेले, लिहिलेले व संगीतबद्ध केलेले “भीमाचा दरारा” या गीताचे औपचारिक विमोचन पार पडले.
या गीताचे विमोचन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत, भीमगीतांच्या माध्यमातून समाजात समता, न्याय आणि बंधुता यांचे विचार पोहोचवण्याचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, ललित प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर व विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्या उपस्थितीत या गीताचे विमोचन करण्यात आले.
“भीमाचा दरारा” हे गीत केवळ एक सांगीतिक प्रस्तुती नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारे प्रभावी माध्यम आहे. या गीताच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत आंबेडकरी विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डॉ. शिवराज शिंदे हे विद्यापीठाच्या ललित व प्रयोगजीवी कला संकुलात संगीत विभागात सहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आवाजात व त्यांनी संगीतबद्ध केलेल्या जिजाऊ वंदनेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. त्यांच्या अनेक संगीत रचना आजही प्रेक्षकांना आकर्षित करत असतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत. या गीतातून चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला मानवंदना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गीतामुळे सामाजिक जाणिवा अधिक दृढ होतील आणि आंबेडकरी चळवळीला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
—————————-

Share

Related posts

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो (मुले) स्पर्धेचे थाटात उदघाटन

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

Chief Editor

विद्यापीठात ‘रॅगिंग प्रतिबंध व पोक्सो’ विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृतीसह सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्मितीवर भर

Chief Editor

नांदेडमध्ये भरदिवसा खून; इंदिरानगर परिसरात खळबळ

Chief Editor

Leave a Comment