यशवंत ‘ मध्ये एनसीसी विभागाच्या वतीने संविधान दिन व रक्तदान शिबिर संपन्न
नांदेड:दिनांक:(२६ नोव्हेंबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने संविधान दिन व ७६ वा एनसीसी स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
संविधान दिन व एनसीसी दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास प्रमुख अतिथी माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून संविधान मूल्यांची काटेकोर अंमलबजावणी प्रभावी आणि परिणामकारक रीतीने करणे आवश्यक आहे तरच आपण महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू शकू, असे मनोगत व्यक्त केले आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना रक्तदान हे महादान आहे. आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे, हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे; असे प्रतिपादन केले आणि संविधान दिन व एनसीसी दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या; तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी आज राष्ट्रीय जबाबदारीतून रक्तदान करीत आहेत. हे कार्य प्रत्येक युवकांसाठी प्रेरणादायी असेल; असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट प्रा.एस.व्ही. सोमठाणकर, डॉ. रामराज गावंडे, प्रा.सचिन महिंद्रकर, नवनाथ धुमाळ, आनंदा शिंदे, प्रा.एकनाथ मिरकुटे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील,सुरेश पाटील उपस्थित होते.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय, विष्णुपुरी येथील डॉ.प्रमोद नांदगाव, शरद अवचार समाजसेवा अधीक्षक प्रकाश सुरनर, प्रयोगशाळा सहाय्यक व वाहनचालक शेख अब्दुल व सर्व एनसीसी कॅडेट्सनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.श्रीरंग बोडके, प्रा.ओमप्रकाश गुंजकर आणि प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.