मानवत व्यापारपेठेत पांढर्या सोन्याची व्यापार्यांनी चालविली लूट ; शेतकर्यामधून संताप
मानवत/ प्रतिनिधी.
मानवत तालूक्याला कापसाचे कोठार समजल्या जात असल्यामूळे राज्यात नव्हे एवढ्या जिनिंग व प्रेसिंग एका मानवत तालूक्यात आहे, मानवत व्यापार पेठेत शेतकर्यांच्या मालाचे रोखदाम मिळत असल्याने शेतकरी मानवत व्यापार पेठेला पहिली पसंदी देतो पण यंदा शासकीय खरेदी बरोबर खाजगी व्यापारी वर्गाने कमी भावात कापसाची खरेदी सूरू केल्यामूळे शेतकर्यांची लूट केल्या जात असल्यामूळे शेतकर्यामधून संताप व्यक्त करीत आहे.
सविस्तर वृत्त असे की,
सध्या तालूक्यात कापसाचे उत्पादन चांगले झाले असून खर्च पण अधिक झाला आहे, शेतकर्यांचे पांढर्या सोन्याला अधिक भाव मिळेल अशा आशेवर शेतकरी तग धरून उभा राहिला आहे.
मानवत तालूक्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक तालूका म्हणून राज्यात ओखला जातो. त्या बरोबर मानवत व्यापार पेठेत शेतकर्यांच्या मालाचे रोख पैसे देण्याची मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीचे युवा सभापती पंकज जाधव, आंबेगावकर यांनी व्यापार्यांना पायंडा घालून दिला असल्यामूळे शेतकर्यांना मालाचे दाम पण नगदी व वेळेवर मिळत असल्यामूळे मानवत व्यापार पेठेला शेतकरी पहिली पसंदी देतो व आपला माल मानवत व्यापार पेठेत विक्रीसाठी आणतो पण पहिल्याच मालाला भाव कमी मिळत असल्यामूळे मानवत व्यापार पेठेत शेतकर्यांची उघड्या डोळ्याने लूट सूरू असल्यामूळे शेतकर्यामधून व्यापार्या विषयी संताप व्यक्त होत आहे.
शासकीय खरेदीदार पण यास हातभार लावत असल्यामूळे खाजगी व्यापार्यांनी शेतकर्यांना कोंडीत पकडून पांढर्या सोन्याला कमी भावाने खरेदी सूरू केल्याने शेतकर्याची लूट होत आहे.
शेतकर्यांची होणारी लूट थांबऊन चांगला भाव द्यावा अशी मागणी मानवत तालूक्यातील शेतकर्यामधून होत आहे.
*