गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यास जिल्हातून मोठ्या संख्येने उपस्थित रहा:राज्यउपाध्यक्ष , नरहरी सोनवणे.*

मानवत / प्रतिनिधी.
रविवार, दिनांक २८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता नांदेड येथील शिव-पार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड येथे संपन्न होणार्या गूणवंताच्या गूण गौरव सत्कार सोहळ्यास राज्यातून अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून या गूणवंताच्या गूण गौरव सोहळ्यास मराठवाड्यासह परभणी जिल्हातून मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा असे आवाहन राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे राज्यउपाध्यक्ष नरहरी सोनवणे, यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त असे की,
दिनांक २८ जूलै रोजी नांदेड येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गूणवंतांचा गूण गौरव व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. खा. वसंतराव चव्हाण साहेब खासदार, नांदेड लोकसभा मतदारसंघ
तर यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शिवहरी गायकवाड सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, नांदेड या प्रसंगी प्रमुख अतिथी ■ मा. सुभाष वानखेडे माजी खासदार, हिंगोली लोकसभा
■ मा.आ. बालाजीराव कल्याणकर आमदार, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ, ■ मा. आ. मोहनअण्णा हंबर्डे आमदार, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ, ■ मा. संभा वाघमारे विदर्भ प्रमुख तथा जिल्हा निरीक्षक, नांदेड, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, विशेष सत्कारमूर्ती अजय बाबाराव इटकरे यूपीएससी उत्तीर्ण या सोहळ्याचे *मुख्य मार्गदर्शक संचालक स्वामी विवेकानंद अकॅडमी परभणीचे मा.प्रा.श्री,विठ्ठल कांगणे सर.*
समाजातील ज्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावी मध्ये ७० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क मेमोची झेरॉक्स प्रत व माहीती स्थानिक राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रतिनिधीकडे आणून द्याव्यात असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड, परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधरजी ठोंबरे विनोद आसोरे, यांनी आवाहन केले आहे, यावेळी संजय सोनटक्के , इंजि. दिगंबर भाडेकर, व्यंकटराव कांबळे , रमेश हराळे उत्तम विदुर वाघमारे सुनिल माहुरे मारोती हराळे विजय इंगळे, संजय वाघमारे ज्योती सोनटक्के सुरेश शेळके , भरत अन्नपुर्वे सचिन दूधंबे, संतोष आडेराव, बालाजी आडेराय, सुरेश सोनटक्के, विष्णु आडेराय, गणेश सोनटक्के, सुनिल सोनटक्के , अभिजीत उतकार सचिन रविराज गंगासागरे सुभाष दुधंबे, हरीष कांचगूंडे इंजि. विशाल बनसोडे, शेषेराव आसोरे, विजय गोरे, आनंद वाघमारे, नागोराव गंगासागरे, गायकवाड गजानन जोगदंड उत्तम राजेंद्र कांबळे के. के. गंगासागरे, संदिप गोरे माधव निंबाळकर आदींची उपस्थीती राहणार आहे.
***