सौ. रामकवर द्वारकादास लड्डा विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमामध्ये विद्यार्थी भक्तित तल्लीन
मानवत / प्रतिनिधी.
विठू नामाचा गजर करीत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला दिनांक 17 जुलै रोजी आषाढी एकादशी . शिक्षण, संस्कार, ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माची जोड घेऊन ह्या वर्षी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि ज्ञानोबा तुकोबाचे निसर्ग विषयक तत्वज्ञान कार्यक्रम या दिवशी घेण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विधार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विठ्ठल – रखुमाई संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, इत्यादी संताच्या भुमिका यावेळी विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. तर टाळ, चिपळ्या, संतांची महती सांगणारे अभंग, संत तुकाराम महाराज, विठ्ठल रुकमाई यांच्या वेशभूषित सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली
यावेळी विद्यार्थी, शिक्षकानी अभंग, गवळणी, भारूड, फुगडी खेळत आनंद साजरा केला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी राजेश्वरी कच्छवे व दीक्षा माळवाड यांनी केले होते. शांभवी गिराम, अनन्या बारहाते , भक्ती शिंदे , आर्या शिंदे, शिवराज पायघन, सिद्धी जाधव , वेदश्री कुलकर्णी , नेतल राठी , अनुष्का मसुरे , या विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठलावर आधारित गीत गायन व अभंग सादर केले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विश्वभूषण इंगोले , तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पणे संपन्न झाला.
**