यशवाडी* येथे गूरू पौर्णिमा गूरू पूजनाने उत्साहात साजरी.

मानवत / प्रतिनिधी.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मैश्री गुर्वेणमः
गूरूंचा महिमा अपरंपार असून त्यामूळे आज गूरूचे सर्वत्र पूजन होत आहे.
आज गुरुपौर्णिमा सणा निमित्त तालूक्यातील कोल्हा येथील *यशवाडी* देवस्थान येथे महंत परम पूज्य १००८ वेदांतचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांचे गूरूपौर्णिमे निमित्त हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेऊन गूरूप्रसादाचे सेवन केले.
सविस्तर वृत्त असे की, आज मानवत तालूक्यातील कोल्हा येथील श्री त्रिमुर्ती हनुमान मंदीर यशवाडी देवस्थान कोल्हा येथे मित्ती आषाढ पौणिमा, रविवार, दि-२१/०७/२०२४ रोजी
गुरुपौर्णिमे निमित्त व्यासपूजन व श्री १००८ वेदांताचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांचे सकाळी ११ ते ९ या वेळेत परभणी जिल्हातील हजारो भाविकांनी हरि कीर्तन व गूरू माऊलीचे अर्शिवाद घेऊन महा प्रसादाचा लाभ घेतला. तर परमभक्त मा. रामभाऊ भिसे यांनी गूरूमाऊलीला पेढा भरवून *गूरूपौर्णिमा महोत्सव* साजरा केला.
गूरूपौर्णिमा असल्यामूळे यशवाडी मंदीर परिसर भाविक भक्तांनी फूलला होता.
**
***