ताज्या घडामोडी

पेडगाव येथे *संत शिरोमणी संत रविदारजी महाराज* मंदीरामध्ये गूरूपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

मानवत / प्रतिनिधी.

आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने संत शिरोमणी गुरू रविदासजी महाराज यांच्या मंदिरामध्ये गूरू पौर्णिमा निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रिय चर्मकार महा संघाचे पदाधिकारी व समाज बांधवांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला अनेक सामाजीक लोक प्रतिनिधी बरोबर समाज बांधव व परिसरातील नागरीक या वेळी मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष रामकिसन कांबळे साहेब , जिल्हा अध्यक्ष विनोद असोरे, जिल्हा सचिव एम.जी.शेवाळेसर, राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा सौ प्रभावती अन्नपूर्वे, जेष्ठ समाजसेवक सुग्रीव ठोंबरे,भगवान गोरे , वसंत वाडेकर, दगडु आसोरे गुरूजी, अनिल आसोरे , गोविंद आसोरे, माऊली लोकरे , अक्षय अन्नपूर्वे , यांच्या सह समाज बांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी सामाजीक उपक्रम राबविण्यात आला.
*गूरूवाणी.*
*आला गुरू पौर्णिमाचा हा क्षण… करूया सारे गुरू रविदासांना वंदन प्रिय आम्हा आमुच्या प्राणाहुनी. गुरू रविदासांची अमृतवाणी कण कण में हमारे गुरू रविदासजी समाये हुए.आओ सब मिलकर गुणगान गुरू रविदासजी का गाए*
अशी गूरूवाणी मा. श्री दगडु आसवरे गुरूजींच्या सूमधूर वाणीतून या वेळी शेकडो भावीकांनी अमृतवाणीचे रसग्रहन त्या नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी अबाल वृध्दासह समाज बांधवांनी महा प्रसादाचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद असोरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी तालुका अध्यक्ष माऊली लोकरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहराध्यक्ष गोविंद आसोरे, व पेडगाव येथील सर्व गुरु रविदास महाराज मंदिर समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.